Breaking News ! राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद पोलिसात गुन्हा दाखल

494 0

औरंगाबाद- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अखेर औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भादंवि. कलम 116 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 12 अटींचे उल्लंघन केल्याने सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

औरंगाबाद- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अखेर औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भादंवि. कलम 116 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 12 अटींचे उल्लंघन केल्याने सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगणे यांच्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

औरंगाबादमध्ये 1 मे रोजी राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. या सभेला काही अटी शर्ती लावण्यात आल्या होत्या. तब्बल 16 अटी लावण्यात आल्या होत्या. यातल्या 12 अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी देखील राज ठाकरे यांच्याविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे. सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

काल दिवसभर औरंगाबादच्या डीसीपींनी सायबर सेलमध्ये बसून राज ठाकरेंच्या भाषणाचे सर्व फुटेज तपासलं. त्याचा निष्कर्ष गृहमंत्रालयाला पाठवण्यात आला होता. गृहमंत्रालयात चर्चा झाल्यानंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला. आज सकाळपासून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात येत होत्या. औरंगाबादेतील सभेप्रकरणी राज ठाकरेंवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पोलिसांनी राज ठाकरेंचं सगळं भाषण तपासल्यानंतर अखेर दुपारच्या सुमारास राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहेत कलमे आणि त्यांचा तपशील ?

कलमं – 116, 117, 153 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 (अटी शर्तींचा भंग करणे)

153 – दोन समूहात भांडण लावणे
116 – गुन्हा करण्यासाठी मदत
117 – गुन्ह्याला मदत करणे, चिथावणीखोर भाषण

 

मनसे आंदोलनावर ठाम

दरम्यान, मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठक पार पडली. तब्बल तासभर ही बैठक सुरु होती. या बैठकीला मुंबई, ठाणे येथील मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषेत पत्रक काढून मनसे आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देशभरातील हिंदू बांधव आणि महाराष्ट्रातील मनसे कार्यकर्ते यांना संबोधित करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!