BULDHANA NEWS:सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चांगल्या आणि वाईट घटना पुढे येतात
परंतु याचं सोशल मीडियामुळे चुकीची होणारी घटना टळल्याचा प्रकार समोर आला.
पहिलं लग्न लपवून दुसऱ्या लग्नाचा घाट घालणाऱ्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्दाफाश झालं पाहुयात हे प्रकरणं नेमकं काय आहे.. BULDHANA NEWS:
BULDHANA NEWS : पहिल्या पत्नीमुळे फसला नवऱ्याचा दुसऱ्या लग्नाचा प्रयत्न
सोशल मीडियावर चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही घटना पाहायला मिळतात..
परंतु सोशल मीडियामुळेच बुलढाण्यातील खामगावात एक चुकीची होणारी घटना टळली…
खामगाव तालुक्यातील कंझार येथील निखिल नवनाथ शेगोकार याने पुण्यातील किरण तायडे हिच्यासोबत आळंदी येथील रुक्मिणी मंगल कार्यालयात विधिवत विवाह केला होता.
त्यानंतर दोघांचं कोर्ट मॅरेज झालं. पण तरीही निखिलने विवाह लपून पुण्यात नोकरी करणाऱ्या उच्चशिक्षित मुलीसोबत पुन्हा विवाह करण्याचा कट रचला.
त्यासाठी त्याने नोकरी करत असल्याची खोटी माहिती देऊन विश्वास संपादन केला.7 मार्च 2025 रोजी साखरपुडा पार पडला त्यावेळी वधू पक्षाकडून निखिलला सोन्याची अंगठी देण्यात आली.
हॉल, केटरिंग, घोडेवाला, फर्निचर अशा मोठ्या थाटामाटात तयारीसाठी वधू पक्षाने सुमारे सात लाख रुपये खर्च केला..
ज्यावेळी ही घटना निखिलची पहिली पत्नी खुशी उर्फ किरण तायडे हिला समजली…
त्यावेळी तिने फेसबुकवरुन वधू पक्षातील पीडित तरुणीशी संपर्क साधून निखिलसोबतच्या विवाहाचे पुरावे, कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट आणि विवाहाचे फोटो दाखवले.
ही माहिती मिळाल्यानंतर वधू पक्षाला मोठा धक्का बसला.
वधू पक्ष निखिलच्या कुटुंबाकडे आले असताना त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून 28 मे रोजी फसवणूक, विवाह संबंधित खोटेपणा, विश्वासघात, फसवणूक या संदर्भात निखिल शेगोकार,मित्र भूषण देशमुख, बहीण राजश्री गुजर, जावई आशुतोष गुजर आणि आई नंदा शेगोकार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.