SIDHANT SANJAY SHIRSAT:समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा वादात! महिलेचे गंभीर आरोप; लग्न, फसवणूक, गर्भपात?

1248 0

SIDHANT SANJAY SHIRSAT: महाराष्ट्राचा राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली..

समाज कल्याण मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर SIDHANT SANJAY SHIRSAT एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले

महिला नेमकी कोण आहे? आणि तिने एवढे गंभीर आरोप का केलेत? पाहुयात यावरचा TOP NEWS मराठी’ चा स्पेशल रिपोर्ट

SIDHANT SHIRSAT NEWS:समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगावादात सिद्धांत शिरसाट वादात
राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांनी महाराष्ट्र होरपळून निघत असतानाच.. आता राज्याचे समाज कल्याण मंत्री आणि छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले.. महिलेने सिद्धांत शिरसाट याने माझी फसवणूक करून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत महिलेच्या वकिलांनी कायदेशीर नोटीस पाठवली

संबंधित महिलेसोबत सिद्धांत शिरसाट यांनी विवाह करून गर्भधारणा झाल्यावर जबरदस्तीने गर्भपात करून घेतल्याचा दावा नोटीसमध्ये केला आहे. सिद्धांत शिरसाट आणि या महिलेची सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यानंतर चेंबूर येथे एका फ्लॅटवर दोघे भेटले, दोघांनी शरीर संबंध ठेवले. सिद्धांत यांनी लग्नासाठी जबरदस्ती केली आणि भावनिक ब्लकमेल करत लग्न केलं नाहीतर आत्महत्या करेल असा आग्रह धरला.

MANIKRAO KOKATE: शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार

लग्नासाठी संबंधित महिला तयार झाल्यावर सिद्धांत आणि महिलेने 14 जानेवारी 2022 ला बौद्ध पद्धतीने विवाह केल्याचा दावा महिलेने केला आहे. दोघांच्या लग्नाचे फोटोचे पुरावे आपल्याकडे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लग्न झाल्यावर सिद्धांत यांनी चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगून छत्रपती संभाजीनगरमध्ये घेऊन जाण्यास नकार दिला. सिद्धांत यांचे इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर त्यांनी, पोलिसात गेल्यावर मी आत्महत्या करेल आणि कुटुंब उद्ध्वस्त करेन अशी धमकी दिल्याचं महिलेने म्हटलं आहे.

RAJENDRA HAGWANE & SUSHIL HAGWANE: फरार राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेच्या अटकेची संपूर्ण INSIDE स्टोरी

राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असतानाच आता एका महिलेने राज्याचे समाज कल्याण मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर गंभीर आरोप केले.. त्याने आपली फसवणूक करून माझा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं या महिलेने तक्रारीत म्हटलं…शाहूनगर पोलिस स्टेशनमध्ये महिलेने तक्रार दाखल केली होती. परंतु सिद्धांतचे वडील संजय शिरसाट हे मंत्री असल्याने पोलिसांनी कारवाई न करता प्रकरण दाबल्याचं नोटीसमध्ये म्हटलं आहे. सिद्धांत यांनी महिलेला सात दिवसांच्या आतमध्ये नांदवण्यासाठी घेऊन जात.. न्याय द्यावा, नाहीतर महिला अत्याचार प्रतिबंध कायदा आणि फसवणूकसारख्या कलमांनुसार कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला.. या प्रकरणांमध्ये ही महिला आयोग गप्प बसणार का? असा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विचारला.. याप्रकरणी पीडित महिलेची रूपाली चाकणकर यांनी भेट देऊन तिला न्याय द्यावा अशी मागणी ही त्यांनी केली.. या प्रकरणामुळे संजय शिरसाट चांगलेच अडचणीत आले असून आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जातं आहे.

NAVALKISHOR RAMl नवल किशोर राम पुण्याचे महापालिका आयुक्त; कशी आहे कारकीर्द?

Share This News
error: Content is protected !!