AJAY TAWARE KIDNEY RACKET पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणानंतर राज्यामध्ये मोठी खळबळ उडाली होती
TOP NEWS MARATHI | AJAY TAWARE KIDNEY RACKET | किडनी रॅकेट प्रकरणात अजय तावरे सहआरोपी
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणानंतर राज्यामध्ये मोठी खळबळ उडाली होती.पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलानं दारुच्या नशेत भरधाव वेगानं आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा अशी अपघातामध्ये जागीच मृत्यू झालेल्यांची नावे होती.
AJAY TAWARE KIDNEY RACKET पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात पोर्शे गाडीचा वेग इतका भरधाव होता की अश्विनी कोस्टा या 15 फूट दूर फेकली गेली. त्यानंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं. पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालन्याय मंडळासमोर उभं करण्यात आलं. बालन्याय मंडळाने त्या अल्पवयीन मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची आणि इतर काही थातूरमातून शिक्षा दिल्या आणि जामीन मंजूर केला होता.
पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताची फेरफार करणाऱ्या डॉ. अजय तावरे याचा अजून एक कारनामा समोर आला आहे. यात रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणात डॉ. तावरे (Dr Ajay Taware) याचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
डॉ.तावरे याला किडनी देणारे आणि किडनी घेणारे हे दोघेही बनावट आहेत हे माहिती होते. तावरे यानेच त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांनी किडनी देताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली होती. रिजनल अॅथोरायझेशन कमिटीचा तावरे त्यावेळी अध्यक्ष होता. आठ सदस्यांची समिती तावरेच्या नियंत्रणाखालीच काम करत होती. जेव्हा किडनी रॅकेट राज्यात गाजले तेव्हा ससूनच्या या समितीबाबतदेखील संशय निर्माण झाला होता. तेव्हा राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली दहा लोकांची समिती नेमली होती.
त्या समितीने केलेल्या चौकशीत तावरेचा हा प्रकार समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.किडनी रॅकेट प्रकरणात डॉ. अजय तावरे हा एफआयआरमधून स्वतःचे नाव वगळण्यात यशस्वी झाला होता. मात्र पोर्शे कार प्रकरणात तो चांगलाच अडकला. दरम्यान, जुन्या गुन्ह्यांचे निर्गतीकरण करताना पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नजरेस किडनी रॅकेट गुन्ह्यातील समितीचा अहवाल वाचण्यात आला. त्यात डॉ. तावरेचे नाव असतानाही त्याच्यावर गुन्हा दाखल नसल्याचे दिसले. यामुळे पोलिसांनी प्रकरणाच्या पुन्हा मुळाशी जाऊन तपास केला. त्यानंतर डॉक्टर तावरे याला सह आरोपी करण्यात आला. अशी माहिती पोलिसांनी दिली.
किडनी रॅकेटप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये रुग्ण अमित अण्णासाहेब साळुंके, सुजाता अमित साळुंखे, गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंके, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवि गायकवाड, अभिजित मदने, रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेज ग्रँट, रेबेका जॉन (उपसंचालक, रुबी हॉल), कायदेशीर सल्लागार मंजूषा कुलकर्णी, डॉ. अभय सद्रे, डॉ. भुपत भाटी, डॉ. हिमेश गांधी आणि समन्वयक सुरेखा जोशी यांचा समावेश होता. आता या प्रकरणांमध्ये सह आरोपी म्हणून डॉक्टर तावरे समावेश करण्यात आला. याप्रकरणी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग सीताराम कदम यांनी तक्रार दिली होती.
PUNE CALL CENTER SCAM: पुण्यात डिजिटल अटकेच्या नावाखाली लाखो डॉलरची लूट
पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताची फेरफार केल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरे हा न्यायालयीन कोठडीत आहे. डॉक्टरला रुपी हॉल क्लिनिक येथील किडनी रॅकेट प्रकरणी आता सहआरोपी करण्यात आला.संबंधित रुग्ण साळुंके याची खरी पत्नीही क्लिनिकमध्ये त्याची विचारपूस करण्यासाठी येत होती. किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर सारिका हिने तिच्या बहिणीला एजंट रवि भाऊने पैसे दिले का? अशी विचारणा केली. त्यावर रवि भाऊने केवळ चार लाख रुपये देण्याचे मान्य केले असल्याचे सांगितले. परंतु, ठरल्याप्रमाणे पंधरा लाख रुपये न मिळाल्याने त्यांच्यातील झालेला तोंडी व्यवहार फिस्कटला. त्यानंतर सारिका व नातेवाइकांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. यानंतर खरे प्रकरण उघडकीस आले. परंतु किडनी रॅकेट प्रकरणात डॉ. अजय तावरे हा एफआयआरमधून स्वतःचे नाव वगळण्यात यशस्वी झाला होता. परंतु पोलिसांनी आता त्याला या प्रकरणात सह आरोपी केला आहे. आता या प्रकरणात आणखी कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.
BEED VIRAL VIDEO: बीडमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला मुंडे गॅंगकडून बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल