CHHAGAN BHUJBAL: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली असून माजी मंत्री आणि येवला विधानसभेचे आमदार (CHHAGAN BHUJBAL) हे उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
छगन भुजबळ उद्या घेणार मंत्रीपदाची शपथ
सकाळी दहा वाजता राजभवनामध्ये छगन भुजबळांचा शपथविधी पार पडेल. छगन भुजबळांची वर्णी पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खात्यावर लागण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यान राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त होतं. त्या जागेवर आता छगन भुजबळ मंत्री होणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री पद भूषवलेल्या छगन भुजबळांच्या पाठीशी अनेक मंत्रिपदांचा अनुभव असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असणाऱ्या छगन भुजबळांची ओबीसी नेते ओळख आहे.
CHHAGAN BHUJBAL : माजी मंत्री छगन भुजबळ यांना मागितली 1 कोटीची खंडणी; नेमकं प्रकरण काय?
महाविकास आघाडी सरकारच्या काळातही छगन भुजबळांनी अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी सापडली होती त्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सामील झाल्यानंतरही छगन भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री पदाचे जबाबदारी देण्यात आली होती
DAUND NEWS : साडेपाच वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण, उसाच्या शेतात अत्याचार; पुण्यात नेमकं चाललंय काय ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात सात दिवसांपूर्वीच भुजबळ यांना पुन्हा मंत्री करण्याबाबतची चर्चा आणि निर्णय झाला. त्यानंतर तो भुजबळ यांना कळवण्यात आल्याची माहिती आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने खात्रीलायक सूत्रांच्या आधारे दिले आहे. छगन भुजबळ यांनी आपल्याला केवळ एका ओळीचा संदेश मिळाल्याचे सांगितले. मला एवढंच सांगण्यात आलं की, राज्य मंत्रिमंडळात माझी वर्णी लागत आहे. मंत्रिपदाचा शपथविधी मंगळवारी सकाळी दहा वाजता होईल
अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. आता थोड्याचेळात महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे राजभवनातील सोहळ्यात छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ देतील.