VAISHNAVI SHASHANK HAGVANE पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे RAJENDRA HAGVANE यांची सून वैष्णवी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात हगवणे कुटुंबावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यातच नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार हगवणेंकडून बक्कळ हुंडा मागितला गेला होता. आणि त्यासाठीच वैष्णवी यांचा छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Santosh Deshmukh Case:पुढील सुनावणी 3 जूनला! Chate’बॅकफूट’वर! निर्दोष मुक्ततेचा अर्ज मागे;Karad ठाम!
23 वर्षीय वैष्णवी कस्पटे VAISHNAVI SHASHANK HAGVANE यांचे राजेंद्र हगवणे RAJENDRA HAGVANE यांचा मुलगा शशांक याच्याशी प्रेम संबंध होते. त्यामुळेच या दोघांचा विवाह दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरवण्यात आला. मात्र त्यावेळी हगवणे कुटुंबीयांनी बक्कळ हूंडा मागितला. वैष्णवी यांचे वडिल आनंद कस्पटे यांनी हगवणे यांना 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी देण्याच्या बोलीवर या दोघांचा विवाह एप्रिल 2023 मध्ये करुन दिला होता. मात्र लग्नात चांदीची भांडी देऊ न शकल्याने दुसऱ्याच दिवशीपासून वैष्णवी यांचा छळ होऊ लागल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे त्यांनी याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या दीड वर्षांच्या काळात वैष्णवी यांचा हुंड्यावरुन शारीरिक आणि मानसिक छळ होऊ लागला होता. त्यामुळेच त्या मानसिक तणावात होत्या. यातूनच 16 मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वैष्णवी आपल्या रूममध्ये गेल्या. बऱ्याच वेळानंतर त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. व समोर वैष्णवी यांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. त्यांना लागलीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. दरम्यान त्यांच्या मृतदेहावर आणि गळ्यावर अनेक जखमा आणि व्रण असल्याचं पोस्टमार्टम रिपोर्ट मधून समोर आलं आहे. त्यामुळे त्यांना कुटुंबीयांकडून जबर मारहाण झाली होती हे सिद्ध होत आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे याच जखमांबाबत पती आणि सासर्याला विचारणा केली असता, ‘तुला आधीच सांगितलं होतं की, आम्हाला पैसे पाहिजेत. विना पैशांचं तुझ्या पोरीला आम्ही फुक्कट नांदवायची का ?, म्हणून मारुन टाकलं तिला”, असं उत्तर त्यांनी दिल्याचा आरोप वैष्णवी यांचे वडील फिर्यादी आनंद कस्पटे यांनी केला.
वैष्णवी यांना हुंड्यासाठी मानसिक, शारीरीक छळ करुन क्रूर वागणूक देऊन आत्महत्याच प्रवृत्त केल्याप्रकरणी हगवणे कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी वैष्णवी यांचा पती शशांक, सासू लता आणि ननंद करिष्मा या तिघांना अटक करण्यात आली असून अजित पवार गटाचा पदाधिकारी आणि वैष्णवी यांचा सासरा राजेंद्र व सुशील हगवणे हे दोघेही फरार आहेत. पुणे पोलिसांकडून दोघांचाही शोध सुरू असून या प्रकरणात अजित पवार राजेंद्र हगवणेवर कारवाई करणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
CHHAGAN BHUJBAL : माजी मंत्री छगन भुजबळ यांना मागितली 1 कोटीची खंडणी; नेमकं प्रकरण काय?