YOUTUBER JYOTI MALHOTRA कालपासून ज्योती मल्होत्रा हे नाव संपूर्ण देशभरात चर्चेत आहे. भारतातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली युट्युबर ज्योती मल्होत्रा YOUTUBER JYOTI MALHOTRA हीला अटक करण्यात आली आहे. मात्र ही ज्योती मल्होत्रा नेमकी कोण आहे आणि तिच्यावर हेरगिरीचे आरोप नेमके का केले जात आहेत पाहूया..
TOP NEWS MARATHI | भारतातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणारी YOUTUBER JYOTI MALHOTRA कोण आहे?
ज्योती मल्होत्रा ही हिने करिअरची सुरुवात रिसेप्शनिस्ट म्हणून केली. पुढे काही काळ तीने शिक्षिका म्हणून नोकरी देखील केली. मात्र दरम्यानच्या काळात सोशल मीडिया आणि youtube ची वाढती क्रेझ पाहून युट्यूब चैनल चालू करण्याचा निर्णय घेतला. तिला फिरण्याची आवड असल्यामुळे तिने ट्रॅव्हल ब्लॉगिंग करायचं ठरवलं. “Travel with Jo” या नावाने यूट्यूब चैनल सुरू करून तिने त्यावर विविध देशांतील प्रवासाचे, पर्यटन स्थळांचे व्हिडीओ शेअर करायला सुरुवात केली. या दरम्यान ती तब्बल चार वेळा पाकिस्तानलाही गेली. तिने व्हिडीओमध्ये पाकिस्तानातील पर्यटन स्थळांची माहिती देत पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतल्या. पाकिस्तानची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाकिस्तानातील प्रेक्षकांकडून तिला मोठी पसंती मिळाली. त्यातूनच तिची पाकिस्तानातील अनेक अधिकाऱ्यांशी ओळख झाली.
तिला पाकिस्तानचा व्हिसा मिळवायचा होता त्यातून तिची पाकिस्तानच्या उच्च आयुक्तालयात काम करणारा अधिकारी दानिश याच्याशी ओळख झाली. त्याने तिची ओळख आणखी दोघांशी करून दिली. पाकिस्तानी व्हीसाच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय नागरिकांवर दहशतवादी कारवाया करणाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची ही नजर असते. त्यातूनच तिची ओळख आयएसआयशी झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळेच आता ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या आयएसआयच्या संपर्कात असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळेच हेरगिरीच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे. दरम्यान तिच्या संपत्ती विषयी बोलायचं झाल्यास, तिच्याकडे लाखो रुपयांची संपत्ती आहे. ती विविध प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड करते ज्यामधून तिला पैसे मिळतात. मात्र या व्यतिरिक्त ही तिच्याकडे अधिकचे संपत्ती असल्याचा संशय आहे. तिच्याकडे इतकी संपत्ती कशी आली ? पाकिस्तानची हिरगिरी केल्याच्या बदल्यात तिला पैसे मिळत होते का ? आणि किती पैसे मिळत होते, याचा तपास सुरू आहे.
PUNE BIBWEWADI NEWS | गाडीला धक्का दिल्याच्या रागातून पुण्याच्या बिबवेवाडीत गोळीबार
एक, दोन नाही तर पाकिस्तानच्या तब्बल चार वाऱ्या केल्याचा आरोप असणारी ज्योती मल्होत्रा पाकिस्तानात जाऊन नेमकं कोणा कोणाला भेटत होती ? तिने स्वतः तिथे जाऊन भारताविषयी कुठली गोपनीय माहिती आयएसआयला दिली ? या सगळ्यांमध्ये ती एकटीच आहे की तिच्याबरोबर आणखी कोणी हेरगिरी करत होतं ? आणि भारताविषयीचे गोपनीय माहिती ती नेमकी कुठून मिळवत होती ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सध्या तिची कसून चौकशी सुरू आहे.