DAUND NEWS : नाईट शिफ्ट वर निघालेल्या महिलेचं तोंड आणि गळा दाबून ओढत निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असताना पुण्यात आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधमाने साडेपाच वर्षांच्या चिमुकलीला उचलून शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. ही घटना वाऱ्याच्या वेगात पसरल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.DAUND NEWS :

DAUND NEWS : साडेपाच वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण, उसाच्या शेतात अत्याचार; पुण्यात नेमकं चाललंय काय ?

1140 0

DAUND NEWS : नाईट शिफ्ट वर निघालेल्या महिलेचं तोंड आणि गळा दाबून ओढत निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असताना पुण्यात आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधमाने साडेपाच वर्षांच्या चिमुकलीला उचलून शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. ही घटना वाऱ्याच्या वेगात पसरल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.DAUND NEWS :

दौंडमध्ये साडेपाच वर्षांच्या मुलीवर उसाच्या शेतात अत्याचार

16 मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणातील फिर्यादींची साडेपाच वर्षांची मुलगी ही पुणे-सोलापूर महामार्गावरील भागवत वस्ती येथील किराणा दुकानासमोर एकटीच उभी होती. तेव्हा भर दिवसा फलटणमधील नवनाथ चंद्रकांत रिठे नावाच्या 27 वर्षीय तरुणाने तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिला थेट दौंड तालुक्यातील मळद गावातील ऊसाच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पीडित मुलीच्या अंगावरील कपडे काढून तिला मारहाण केली. घाबरलेली मुलगी मोठमोठ्याने रडत होती, त्यामुळे तिला शांत करण्यासाठी या नरधमाने तिला मारहाण करत धमकी दिली. व तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही चिमुकली जीवाच्या आकांताने आरडा ओरडा करत होती. त्यामुळेच काही ग्रामस्थांना तिचा आवाज ऐकू गेला. नेमकं काय घडतय हे पाहण्यासाठी ते घटनास्थळी दाखल झाले व सर्व प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

नराधम आरोपी नवनाथ रिठे याला दौंड पोलिसांनी अटक केली आहे. तर या भयंकर प्रकरणानंतर मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात असलेल्या पीडित मुलीवर उपचारही सुरू आहेत. मात्र एकीकडे रात्रीच्या वेळी एक महिला सुरक्षित नाही तर दिवसा एक चिमुकली सुद्धा सुरक्षित नसल्याने पुणे जिल्ह्यात नेमकं काय चाललंय असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातो. त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी ही केली जात आहे.

BEED VIRAL VIDEO: बीडमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला मुंडे गॅंगकडून बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

ISIS TERRORIST ARREST: पुण्यातील कोंढवा, वानवडीतील दहशतवाद्यांना इंडोनेशियामधून अटक; दहशतवादी हल्ल्यांचा कट उधळला ?

SHRIMANT BHAUSAHEB RANGARI GANPATI: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या वतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

Share This News
error: Content is protected !!