ULHASNAGAR BOY NEWS:गुन्हेगाराचे अल्पवयीन मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; रक्तबंबाळ मुलगा पाहून आई- वडील हादरले

ULHASNAGAR BOY NEWS:गुन्हेगाराचे अल्पवयीन मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; रक्तबंबाळ मुलगा पाहून आई- वडील हादरले

1586 0

ULHASNAGAR BOY NEWS: राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना आता अल्पवयीन मुलं देखील असुरक्षित आहेत.

उल्हासनगर ULHASNAGAR BOY NEWS: मध्ये घडलेल्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला चीड आणली आहे. उल्हासनगर मधील अल्पवयीन मुलावर एका सराईत गुन्हेगाराकडून शौचालयामध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आलेत.

PCMC CHAKAN LADY NEWS: चाकणमध्ये कामावर निघालेल्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा कबुली जबाब
ही घटना उल्हासनगर मध्ये 15 मे रोजी घडली. अमित कोतपिल्ले असं या नराधम आरोपीचं नाव असून तो नुकताच एका गंभीर गुन्ह्यातून कारागृहाबाहेर आला होता. उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शौचालयात अल्पवयीन मुलगा गेला होता. त्यावेळी आरोपी अमित याने त्याचा पाठलाग करत शौचालय गाठलं. तिथे या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले.

हे झाल्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. त्यानंतर मानसिक व शारीरिक धक्का बसलेला हा अल्पवयीन मुलगा रक्तबंबाळ शरीराने घरी गेला. तिथे त्याने आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने पोलीस ठाणं गाठून आरोपी विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी लगेचच तक्रार दाखल करून घेत आरोपीचा शोधही सुरू केला. आरोपी अमित याने याआधीही अनेक गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्यामुळे तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

त्याला शोधून पोलिसांसाठी जास्त अवघड ठरलं नाही. तो काही तासातच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

PUNE CRIME NEWS: गर्लफ्रेंडकडून लग्नास नकार अन् बॉयफ्रेंडने केले ‘ते’ व्हिडिओ व्हायरल; पाहा संपूर्ण प्रकरण काय?
अचानक घडलेल्या या विचित्र घटनेने पीडित मुलगा हा प्रचंड तणावात आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्याविषयी समस्त राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे आरोपी अमित कोतपिल्ले याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात सादर केलं. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र त्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी उल्हासनगर मधील रहिवाशांनी केली आहे.

BEER PRICE DECREASE: बिअर प्रेमींसाठी खुशखबर! 200 ची बिअर आता 50 ला मिळणार

Top News विशेष! Valmik Karad चा धाक, Parli ची ‘राख :’राखे’च्या ढिगाऱ्यावर उभा ‘वाल्या’च्या गुन्ह्यांचा डोलारा!

MAHAD VINHERE NEWS;महाड विन्हेरे गावाजवळ भीषण अपघात; अपघातात एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी

Dombivli Crime news : डोंबिवलीत अंडी विक्रेत्याची तब्बल ‘इतक्या’ लाखांची फसवणूक; नेमकं प्रकरण काय?

Share This News
error: Content is protected !!