BEER PRICE DECREASE

BEER PRICE DECREASE: बिअर प्रेमींसाठी खुशखबर! 200 ची बिअर आता 50 ला मिळणार

2115 0

BEER PRICE DECREASE देशातील बियर प्रेमींसाठी एक खुशखबर आहे. आता दोनशे रुपयांना मिळणारी बियर केवळ पन्नास रुपयांना मिळणार आहे. होय तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. मात्र हे कधी आणि कसं शक्य होणार आहे पाहूया…BEER PRICE DECREASE

भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावांमुळे अनेक क्षेत्रांवर याचा परिणाम होत आहे. जागतिक बाजारपेठेत मंदी येण्याची शक्यता असताना दुसरीकडे या मंदीचा वातावरणातही भारताकडे एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे. भारत आणि ब्रिटन (India and Britain) यांच्यातील मुक्त व्यापार कराराची (Free Trade Agreement) संधी चालून आली आहे.

ज्यामुळेच भारतातील बियर चे दर 70% पेक्षा जास्त कमी होऊ शकतात. भारतात ब्रिटनच्या बियरचे अनेक ब्रँड प्रसिद्ध आहेत.

त्याला भारतात मोठी मागणी देखील आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार हा महत्त्वपूर्ण करार 6 मे 2025 रोजी झाला.

या करारानुसार ब्रिटनच्या उत्पादनांना लागू होणारं आयात शुल्क 75 टक्क्यांनी कमी होणार आहे. या करारानुसार आयात शुल्कामध्ये मर्यादित सवलत देण्यात आली आहे.

त्यामुळेच भारताने ब्रिटनच्या बिअरवरील कर तब्बल 75 टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे 200 रुपये किमतीची बिअर आता अवघ्या 50 रुपयांना मिळण्याची शक्यता आहे.

BEER PRICE DECREASE: भारतात बिअरच्या किंमती 75 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता

तर दुसरीकडे या मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला आणि व्यापाराला चालना मिळण्याची शक्यता आहे.

PUNE POLICE LAND SCAM: वाघोली जमीन घोटाळा प्रकरण, पोलीस निरीक्षकासह चार जणांवर गुन्हा दाखल
ब्रिटनच्या ब्रँडच्या बियरच्या नव्या किमती लवकरच लागू होऊ शकतात. त्यामुळे बिअरप्रेमींसाठी ही एक मोठी खुशखबर मानली जात आहे.

त्याचबरोबर जरी किंमत कमी झाली असेल तरीही कमी किमतीमुळे मागणी वाढू शकते ज्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होऊ शकतो.

HARSHWARDHAN SAPKAL: भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी

PCMC CRIME NEWS : दोघांमधील संबंध… अन् पिंपरी-चिंचवडमधील तरुणीचा मामा-भाच्याने का काढला तरुणीचा काटा?

भारत पाकिस्तानच्या ‘DGMO’ मध्ये कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

HARSHWARDHAN SAPKAL: भारत पाकिस्तान हल्ल्याप्रकरणी सर्वांनी भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी उभे रहावे.

OPERATION SINDOOR नंतर आता भारताकडून सुरू असलेलं OPERATION SEED नेमकं काय ?

HARSHWARDHAN SAPKAL: भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी

KUDAL POLICE NEWS | ‘ईनशा अल्लाह, इंडिया को उडाने भाईजान आ रहे है’ पोलिसांना आला फोन अन् पुढे घडलं भयंकर..

Share This News
error: Content is protected !!