Pune NCP President Deepak Mankar Resigns l पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू अशी ओळख असलेले पुणे शहराचे माजी उपमहापौर दीपक मानकर (Pune NCP President Deepak Mankar Resigns) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

Pune NCP President Deepak Mankar Resigns| दीपक मानकर यांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

1653 0

Pune NCP President Deepak Mankar Resigns l पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू अशी ओळख असलेले पुणे शहराचे माजी उपमहापौर दीपक मानकर (Pune NCP President Deepak Mankar Resigns) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

BJP NEW CITY PRESIDENT| 36 जिल्हे 58 जिल्हाध्यक्ष; स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपची रणनीती ठरली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे दीपक मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्त केलाय. बनावट कागदपत्र सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात दीपक मानकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर तात्काळ मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्त केला आहे. (Pune NCP President Deepak Mankar Resigns)

नेमकं प्रकरण काय?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या शंतनू कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्कार प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती या प्रकरणी चौकशीसाठी दीपक मानकर यांना बोलावलं असता त्यांनी शंतनू कुकडे सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी पुरावा म्हणून पोलिसांकडे काही कागदपत्र सादर केली होती. पोलिसांकडून पडताळणी केली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर दिपक मानकरच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शंतनू कुकडे याला अटक करण्यात आली होती.

तपासादरम्यान शंतनू कुकडे याच्या बँक खात्यावरुन कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले होते. आरोपी शंतनू कुकडेचा जवळचा सीए रौनक जैन याच्या बँक खात्यामधून मानकर पिता-पुत्राच्या बँक खात्यामध्ये पावणेदोन कोटी रुपये आल्याची माहिती आहे. दरम्यान,

पोलिस तपासात कुकडेच्या बँक खात्यात 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पोलिसांना आढळून आली . त्यातील 40 ते 50 कोटी रुपये काहीच्या बँक खात्यावर पाठवण्यात आल्याचे निदर्शनास आले होते.मात्र, दीपक मानकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. रौनक जैन याच्या बँक खात्यातून आमच्या बँक खात्यात पैसे आले आहेत. आमचा एका जमिनीचा व्यवहार आहे. तो रौनक याच्या सोबत झाला. त्याची कायदेशीर इसार पावती देखील झालेली आहे. शंतनू कुकडे याचे वैयक्तिक जीवन आणि त्याचे आर्थिक व्यवहार याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, असे दीपक मानकर यांनी म्हटले होते.

पुण्याचा महापौर भारतीय जनता पार्टीचाच होणार हा विश्वास – धीरज घाटे

दोघांमधील संबंध… अन् पिंपरी-चिंचवडमधील तरुणीचा मामा-भाच्याने का काढला तरुणीचा काटा?

Jalna News | जालना जिल्हा हादरला; बाप लेकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

PUNE NCP CITY PRESIDENT DEEPAK MANKAR:अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांवर गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

Share This News
error: Content is protected !!