PCMC CRIME NEWS : दोघांमधील संबंध… अन् पिंपरी-चिंचवडमधील तरुणीचा मामा-भाच्याने का काढला तरुणीचा काटा?
पिंपरी चिंचवड PCMC CRIME NEWS : शहरात 11 मे रोजी एका अठरा वर्षे तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. एका 18 वर्षीय तरुणीची एवढी निर्घृण हत्या का करण्यात आली? याचं धक्कादायक कारण आता समोर आलंय.पिंपरी चिंचवड मधील वाल्हेकरवाडी परिसरात 18 वर्षीय तरुणी कोमल भरत जाधव हिची धारदार शस्त्राने वार करून PCMC CRIME NEWS :
PCMC WALHEKARWADI GIRL NEWS :पिंपरीतील मामा-भाच्याने का काढला तरुणीचा काटा? #TOPNEWS_PCMC
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तिची हत्या केली. या हत्येने पिंपरी चिंचवड शहर हादरलं.रविवारी कोमल घरात होती. त्यावेळी बाईकवरून दोन जण आले. त्यांनी तिला घराबाहेर बोलावून घेतले. कोमल घरातून बाहेर आली. ती समोर येताच आरोपींनी तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात तिचा जागेवरच मृत्यू झालापोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपीला शोधण्यासाठी वेगाने तपास सुरू केला आणि दोन आरोपींना बेड्या ठोकल्याया प्रकरणी उत्तर प्रदेशाचा रहिवाशी असलेल्या 45 वर्षीय मुख्य आरोपी उदयभान यादव आणि त्याच्या सख्ख्या भाच्याला पोलिसांनी अटक केली आहे.मयत तरुणी आणि आरोपी उदयभान यादव शेजारी राहत होते. दोघांमध्ये संबंध होते. यातून दोघांमध्ये काही आर्थिक व्यवहार देखील झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याच संबंधातून निर्माण झालेल्या वादामुळे आरोपींनी कट रचून कोमलची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
तरुणी कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. रविवारी कोमल जाधव घरामध्ये होती. यादव हा तिच्याच शेजारी वास्तव्यास होता. त्या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाले होते. त्यामुळे उदयाभान याने कोमल हिला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने आपल्या भाच्याच्या मदतीने रविवारी रात्री दुचाकीवरून डोक्यात हेल्मेट घालून कोमलला घराच्या बाहेर बोलावून घेतलं. कोमल घराच्या खाली आली, त्यानंतर तिच्यावर शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात कोमलचा जागीच मृत्यू झाला.
परराज्यातील मामा-भाज्यांनी 18 वर्षीय कोमल भगत हिची दुचाकीवरून हेल्मेट घालून येतं धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केली. आरोपींनी चेहरा ओळखू येऊ नये यासाठी दोन्हीही आरोपींनी हेल्मेट घातले होते. परंतु सदर घटनेत सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन ही परप्रांतीय दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून कसूनच तपास सुरू आहे. त्याचबरोबर या हत्येमध्ये इतर कोण कोण सहभागी होतं आणि या हत्येची नेमकी काय कारण आहेत. त्यांच्यामध्ये कशा पद्धतीचे आर्थिक व्यवहार झाले होते याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मयत कोमल जाधव आणि आरोपी हे शेजारी राहत होते. त्या दोघांमध्ये संबंध होते. त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारही झाले होते. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाले होते. त्यानंतर आरोपीने भाच्याच्या मदतीने हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर वाल्हेकरवाडी परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे. खरंतर पिंपरी चिंचवडमध्ये सातत्याने गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या घटनांना आळा कधी बसणार असा प्रश्नही आता सर्वसामान्य जनतेतून विचारला जातोय.
Aditya Thackeray Dream Project BKC Cycle track | आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट गुंडाळणार
Operation Sindoor: अवघ्या 25 मिनिटांत पाकिस्तानचा खेळ खल्लास; ऑपरेशन सिंदूर ची INSIDE STORY