PUNE NCP CITY PRESIDENT DEEPAK MANKAR पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली असून अजित पवारांचे विश्वासू अशी ओळख असणारे राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्र दाखल करून पोलिसांची दिशाभूल केल्या प्रकरणी पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...

PUNE NCP CITY PRESIDENT DEEPAK MANKAR:अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांवर गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

1666 0

PUNE NCP CITY PRESIDENT DEEPAK MANKAR पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली असून अजित पवारांचे विश्वासू अशी ओळख असणारे राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्र दाखल करून पोलिसांची दिशाभूल केल्या प्रकरणी पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात…

TOP NEWS MARATHI | PUNE NCP CITY PRESIDENT DEEPAK MANKAR:अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांवर गुन्हा #topnewsmarathi #ajitpawar #deepakmankar #shantanukukade #Marathibreakingnews #marathinews #marathinewslive #superfast #topnewsmarathi #marathitopnewsnews #liveblog #liveupdate #todaybreakingnews #ताज्या_बातम्या #लेटेस्ट_व्हिडिओ #topstory #मराठी_बातम्या #latestmarathinews

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या शंतनू कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्कार प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती या प्रकरणी चौकशीसाठी दीपक मानकर यांना बोलावलं असता त्यांनी शंतनू कुकडे सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी पुरावा म्हणून पोलिसांकडे काही कागदपत्र सादर केली होती.PUNE NCP CITY PRESIDENT DEEPAK MANKAR

परंतु सादर केलेल्या कागदपत्राची पोलिसांकडून पडताळणी केली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर दिपक मानकरच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शंतनू कुकडे याला अटक करण्यात आली होती.

तपासादरम्यान शंतनू कुकडे याच्या बँक खात्यावरुन कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले होते. आरोपी शंतनू कुकडेचा जवळचा सीए रौनक जैन याच्या बँक खात्यामधून मानकर पिता-पुत्राच्या बँक खात्यामध्ये पावणेदोन कोटी रुपये आल्याची माहिती आहे. दरम्यान,

पोलिस तपासात कुकडेच्या बँक खात्यात 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पोलिसांना आढळून आली . त्यातील 40 ते 50 कोटी रुपये काहीच्या बँक खात्यावर पाठवण्यात आल्याचे निदर्शनास आले होते.मात्र, दीपक मानकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. रौनक जैन याच्या बँक खात्यातून आमच्या बँक खात्यात पैसे आले आहेत. आमचा एका जमिनीचा व्यवहार आहे. तो रौनक याच्या सोबत झाला. त्याची कायदेशीर इसार पावती देखील झालेली आहे. शंतनू कुकडे याचे वैयक्तिक जीवन आणि त्याचे आर्थिक व्यवहार याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, असे दीपक मानकर यांनी म्हटले होते.

ANJALI DAMANIYA ON GOTYA GITTE: रघुनाथ फड गॅंगवर मकोका; गोट्या गित्ते अद्याप फरार कसा ?

AHILYANAGAR CRIME NEWS: इंस्टाग्रामवरील ‘तो’ मेसेज  अन् गेला तरुणाचा जीव; पुण्यातील तरुणाची अहिल्यानगरमध्ये हत्या

KUDAL POLICE NEWS | ‘ईनशा अल्लाह, इंडिया को उडाने भाईजान आ रहे है’ पोलिसांना आला फोन अन् पुढे घडलं भयंकर..

Share This News
error: Content is protected !!