PCMC NEWS: 18 वर्षीय तरुणीच्या हत्येनं पिंपरी- चिंचवड हादरलं!

PCMC NEWS: तरुणीला घराबाहेर बोलावलं, सपासप वार केले अन् फरार झाले; पिंपरी चिंचवड शहर हादरलं!

1530 0

PCMC NEWS: 18 वर्षीय तरुणीच्या हत्येनं पिंपरी- चिंचवड हादरलं!

पिंपरी चिंचवड शहर अठरा वर्षीय तरुणीच्या हत्येनं हादरलंय. वाल्हेकरवाडी परिसरात या तरुणीची भर रस्त्यात धारदार शस्त्रानी वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. PCMC NEWS:तर आरोपींना पकडण्यात आता पोलिसांना यश आलंय.

TOP NEWS MARATHI | PCMC NEWS: दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी कोमल नावाच्या 18 वर्षीय तरुणीला संपवलं
PCMC NEWS:कोमल भरत जाधव असं या 18 वर्षीय मृत तरुणीच नाव आहे. ती तिच्या आई आणि भावासह वाल्हेकरवाडी परिसरात वास्तव्यास आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या या तरुणीवर कृष्णाई कॉलनी मध्ये धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी हे वार केले आणि सुसाट वेगात हे दोघेही फरार झाले.

हे वार भर चौकात झाल्याने कोमल रक्ताच्या थारोळ्यात काही काळ पडून होती. त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांनी घोषित केलं. कोमलची हत्या करून पळून जाणारे आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. मात्र त्यांचे चेहरे दिसत नसल्यामुळे आरोपींची ओळख पटवून पोलिसांसाठी अवघड होतं. दरम्यान नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय.घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी लगेचच आरोपींचा माग काढायला सुरुवात केली.

चिंचवड पोलिसांचा डीबी स्कॉड, गुंडा विरोधी पथक, तपास पथक यांनी सीसीटीव्ही च्या माध्यमातून तपास करत आरोपींचा अवघ्या काही तासात छडा लावला. त्यातूनच मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही आरोपी मुळचे दिल्लीचे आहेत. त्याचबरोबर मयत कोमल आणि आरोपी हे आधीपासूनच एकमेकांना ओळखतात. आरोपींनीच कोमलला घराबाहेर बोलावलं होतं, त्यानंतर त्यांनीच तिच्यावर वार केल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र या हत्येमागचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. परंतु या हत्येमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

ANJALI DAMANIYA ON GOTYA GITTE: रघुनाथ फड गॅंगवर मकोका; गोट्या गित्ते अद्याप फरार कसा ?

AHILYANAGAR CRIME NEWS: इंस्टाग्रामवरील ‘तो’ मेसेज  अन् गेला तरुणाचा जीव; पुण्यातील तरुणाची अहिल्यानगरमध्ये हत्या

ANDHRA PRADESH COUPLE NEWS| लॉन्ग ड्राईव्ह, नूडल्स- आईस्क्रीम, अन्… प्रेम प्रकरणाचा थरकाप उडवणारा शेवट

Share This News
error: Content is protected !!