अक्षय्य तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य

508 0

पुणे- आज अक्षयतृतीये निमित्त पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. या आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून बाप्पाच्या चरणी मांडणी करण्यात आली आहे. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दरवर्षी अक्षयतृतीये निमित्त हा आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात येतो.

आंब्यांची ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली होती. हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये साठविण्यासाठी अनेकांचे मोबाईल सरसावले होते. हे आंबे उद्या ससूनमधील रुग्ण,अनाथाश्रम, वृद्धाश्रम ,दिव्यांग आणि भाविंकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहेत.

आंबा महोत्सव निमित्त मंदिरामध्ये पहाटे 4 ते 6 प्रसिद्ध गायिका आशा ताई खाडिलकर यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर सकाळी 8 ते 12 गणेश याग, दुपारी 12.36 ला भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा आणि रात्री 9 वाजता अखिल भारतीय महिला मंडळाच्या वतीने भजन आयोजित करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!