AHILYANAGAR CRIME NEWS: सोशल मीडियावर तरुणीला मेसेज करून शिवीगाळ केल्याच्या वादातून पाच जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.AHILYANAGAR CRIME NEWS
ज्यामध्ये या तरुणाचा मृत्यू झाला. तर तरुणाला मारहाण करून विष पाजल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकाने केलाय. पाहूयात हे प्रकरण नेमकं काय आहे?AHILYANAGAR CRIME NEWS:
मयत तरुण साईनाथ गोरक्षनाथ काकड हा 24 वर्षीय तरुण पुण्यात शिक्षण घेतं होता.
मयत साईनाथ काकड आणि आरोपी तरुणी रूपाली लोंढे हे पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते.
PUNE NCP DEEPAK MANKAR NEWS | दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल UNCUT
हे दोघेही एकमेकांना ओळखत होते. मृत तरुण साईनाथ काकड यांनी आरोपी तरुणी रूपाली लोंढे हिच्या बहिणीच्या विरोधात मेसेज करून शिवीगाळ केली.
त्यानंतर त्याचा राग मनात धरून आरोपी रूपाली लोंढे आणि तिच्या इतर चार साथीदारांनी 10 मे रोजी साईनाथ काकड याचं पुण्यातून जबरदस्तीने अपहरण केलं.
त्यानंतर त्याला कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण AHILYANAGAR CRIME NEWSगावात आणले. तिथेच साईनाथला बेदम मारहाण करण्यात आली.
त्यानंतर आरोपींनी साईनाथ याच्या घरी संपर्क करून तुमचा मुलगा बेशुद्ध अवस्थेत पडला आहे त्याला घेऊन जा असं सांगितलं.
त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी साईनाथला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी साईनाथला मृत घोषित केलं.
साईनाथला विषारी औषध पाजल्याचा आरोप साईनाथच्या कुटुंबियांनी केला.या प्रकरणी मृत साईनाथचा भाऊ महेश काकड याने कोपरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलीसांनी रुपाली संजय लोंढे, अनिल संजय लोंढे, दिनेश विठ्ठल आसने, पवन कैलास आसने, राहुल अशोक चांदर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय.
सोशल मीडियावर तरुणीला शिवीगाळ केल्याचा मेसेज केल्याने साईनाथ काकड याला आपला जीव गमावला लागला.
या प्रकरणी साईनाथचा भाऊ महेश काकड यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक केली आहे.
या दोन आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 17 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.
मयत साईनाथ आणि आरोपी यांची पूर्वीपासूनच ओळख असल्यानं नेमकं काय घडलं? ज्यामुळं थेट हत्या करण्यात आली. असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
या प्रकरणी तपास सुरू असून, पोलीस तपासातून काय धक्कादायक गोष्टी पुढे येतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.
OPERATION SINDOOR नंतर आता भारताकडून सुरू असलेलं OPERATION SEED नेमकं काय ?