THANE TITWALA CASE POLICE STATION:

THANE TITWALA CASE POLICE STATION: ठाण्यात मैत्रिणीनेच मित्रांच्या मदतीने केले आपल्याच मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार

1082 0

THANE TITWALA CASE POLICE STATION: मैत्रिणीला मैत्रीत धोका देत मित्रांकरवे मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची भयंकर घटना ठाण्यातून समोर आली आहे. THANE TITWALA CASE POLICE STATION:

पीडित तरुणीला तिच्याच मैत्रिणीने नशेचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं आणि अनेक दिवस दाबून ठेवून तिच्यावर मित्रांच्या माध्यमातून लैंगिक अत्याचार केले. मैत्रीला काळीमा फासणारी ही घटना ठाण्याच्या टिटवाळा TITWALA :परिसरात घडली.

THANE TITWALA CASE POLICE STATION : ठाण्यात मैत्रिणीनेच मित्रांच्या मदतीने केले मैत्रिणीवर अत्याचार

21 वर्षीय पीडित तरुणी ही बल्याणी परिसरात आपली आजी आणि चुलत भाऊ-बहिणीसोबत राहते. मोलमजुरी करून ती आपलं घर सांभाळते. मात्र तिचे 19 मार्च रोजी आजी बरोबर किरकोळ कारणावरून वाद झाले. याच वादातून तिने थेटपणे घर सोडलं. बांधकाम साइटवर ओळख झालेली मैत्रीण झीनत हिच्या घरी जाण्याचा निर्णय तरुणीने घेतला. झीनतच्याच शेजारी शबनम नावाची आणखी एक मैत्रीण राहते. त्यामुळे ही तरुणी कधी शबनमंतर कधी झीनतच्या घरी राहत होती‌. मात्र त्यानंतर तरुणीने पुन्हा आजीकडे जाण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मैत्रिणींना सांगून ती निघाली तेवढ्यात या मैत्रिणींनी संगणमत करून त्यांचा मित्र असलेल्या गुड्डू नावाच्या तरुणाला कार घेऊन बोलावलं. गुड्डू सोबत मित्र असलेला गुल्फाम देखील आला. तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने हे चार जण कार घेऊन बाहेर पडले. मात्र तरुणीच्या घरी न जाता त्यांनी तिला थेट एनसीआर कंपनीच्या मागे असलेल्या चाळीत नेलं. तिथे काम दाखवायचं आहे असा बहाणा करून एका खोलीत बंद करून ठेवलं. त्याचवेळी या तरुणीच्या मानेवर शबनमने नशेचं इंजेक्शन दिलं. त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या तरुणीवर लियाकत नावाच्या पुरुषाच्या घरी सोडण्यात आलं. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पुढचे चार-पाच दिवस तरुण शुद्धीवर आली की लगेच तिला नशेचं इंजेक्शन दिलं जात असल्याचा आरोप तिने केला आहे. शुद्धीवर आलेला तरुणीने मित्रांना घरी जाऊ देण्याची विनंती केली मात्र त्यावेळी या पाचही जणांनी मिळून आंबिवली येथील रूमवर अली इराणी या आणखी एका मित्राला बोलावलं. तरुणीला फाशी देण्याची आणि तिच्या कुटुंबाला संपवण्याची धमकी इराणीने तसेच आजी विरोधात खोटी तक्रार द्यायला भाग पाडलं. हा सर्व प्रकार महिनाभर सुरू होता. वेगवेगळ्या ठिकाणी या तरुणांकडून पीडीतेवर लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. मात्र अखेर तीन मे रोजी स्वतःची सुटका करून घेण्यात तरुणीला यश आलं. आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

तीन मे रोजी दुपारी बारा वाजता तरुणीला डांबून ठेवलेल्या आंबिवली येथील चाळीतील घरात कोणीच नव्हतं. त्यावेळी तिने दरवाजा तोडून पळण्याचा प्रयत्न केला मात्र कुलूप असल्याने तिला ते शक्य झालं नाही. त्यावर तिने खिडकीतून जोरजोरात आरडाओरडा करून एका व्यक्तीला दरवाजाजवळ बोलावलं. इथून बाहेर काढण्याची विनंती केली. त्याच व्यक्तीने कुलूप तोडून तरुणीची सुटका केली व तिला तिच्या कुटुंबाच्या सुपूर्त केलं. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दुर्दैवाने अजून एकही आरोपी सापडलेला नाही.

Anna Hajare: भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले….

HARSHWARDHAN SAPKAL: सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आता पळवाटा न शोधता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या

Operation Sindoor: अवघ्या 25 मिनिटांत पाकिस्तानचा खेळ खल्लास; ऑपरेशन सिंदूर ची INSIDE STORY

Share This News
error: Content is protected !!