BHIWANDI NEWS:

BHIWANDI NEWS: लटकलेले मृतदेह, सुसाईड नोट आणि उद्ध्वस्त कुटुंब भिवंडीतील आत्महत्या कांड

1178 0

BHIWANDI NEWS: पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींचं एक हसतं खेळतं कुटुंब ठाण्यात वास्तव्यास होतं. नेहमीप्रमाणे पती कामासाठी नाईट शिफ्टला गेला. सकाळी परत आला, पत्नी आणि मुली आपली वाट पाहत असतील, अशी त्याला अपेक्षा होती. मात्र दरवाजा उघडला आणि समोर दिसले फासावर लटकलेले एक-दोन नव्हे तर तब्बल चार मृतदेह… भिवंडीत (BHIWANDI NEWS) नेमकं काय घडलं पाहूया…

लालजी बनवारीलाल भारती असं दुर्दैवी व्यक्तीचं नाव आहे. ते ठाण्याच्या भिवंडीतील एका चाळीत वास्तव्यास होते. ते यंत्रमाग कामगार असून नेहमीप्रमाणे कामावर गेले.

BHIWANDI NEWS: भिवंडीत आईने स्वतःसह तीन मुलींना संपवलं; नेमकं कारण काय ?

नाईट शिफ्ट असल्याने ते शुक्रवारी रात्री कामासाठी बाहेर पडले, कंपनीत गेले आणि काम संपवून सकाळी घरी परतले. बऱ्याच वेळ दरवाजा वाजवूनही आतून कोणीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी खिडकीतून डोकावून आत पाहिलं. मात्र आतलं दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला.

कारण लालजी यांना समोर दिसले ते संपूर्ण कुटुंबाचे लटकते मृतदेह.. लालजी बनवारीलाल यांची पत्नी असलेल्या पुनीता या 32 वर्षीय महिलेने आपल्या तीन मुलींसह आत्महत्या केली.

यात बारा वर्षांची नंदिनी, सात वर्षांची नेहा आणि चार वर्षांच्या अनुचा मृत्यू झाला. हे पाहून लालजी यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर लगेचच पोलिसांना पाचारण करण्यात आलं.

पोलिसांनी हे मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. त्यावेळी घरातच पत्नी पुनिता हिने लिहिलेली सुसाईड नोट देखील सापडली. त्यामध्ये आत्महत्ये मागचं कारण लिहिलेलं नाही मात्र आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये आपण आपल्या स्वैच्छेने आत्महत्या करत असल्याचं लिहिण्यात आलं आहे.

या प्रकरणात आता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र अतिशय चांगल्या सुरू असलेल्या संसारात हा मिठाचा खडा नेमका का पडला ? पुनिता हिने आधी मुलींची हत्या करून मग आत्महत्या केली ? की चौघींनी ही एक साथ आत्महत्या केली ? हा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. मात्र या प्रकरणामुळे संपूर्ण भिवंडीत एकच खळबळ उडाली आहे.

Top News विशेष! Valmik Karad चा धाक, Parli ची ‘राख :’राखे’च्या ढिगाऱ्यावर उभा ‘वाल्या’च्या गुन्ह्यांचा डोलारा!

BREAKING NEWS | अखेर सतीश भोसले उर्फ ‘खोक्याभाई’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

POLITICAL SPECIAL EXCLUSIVE REPORT: 1962 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले तब्बल ‘इतके’ अपक्ष आमदार

State Water storage: धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

पुणेरी दणका : रस्त्यावर कराल घाण तर करावी लागेल साफ ! थुंकी साफ करतानाचा व्हिडिओ पुणे मनपाकडून व्हायरल

 

Share This News
error: Content is protected !!