HOUSE ARREST SHOW

अश्लील भाषा, कंटेंट, आणि इंटीमेट पोझ; वादाच्या भोवऱ्यात अडकलेला HOUSE ARREST SHOW नेमका काय ?

3263 0

HOUSE ARREST SHOW सध्या सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मस् अश्लीलतेचा कळस बनलेत. त्यातच आता “हाऊस ऑफ अरेस्ट”(HOUSE ARREST SHOW) या शोने सगळीकडेच धुमाकूळ घातलाय. अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंट असलेल्या या शोच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या असून त्यामुळेच या शोवर बंदी घालण्याची मागणी महिला आयोगापासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यांनीच केली आहे. त्यामुळे हा शो नेमका काय आहे ? आणि ही कॉन्ट्रोवर्सी कशावरून सुरू आहे पाहून.हा शो उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू आहे. याचं सूत्रसंचालन नेहमीच वादग्रस्त राहिलेला अभिनेता एजाज खान करत आहे. हा एक रियालिटी शो असून त्यामध्ये अनेक तरुण तरुणी सहभागी आहेत. त्यांना वेगवेगळे टास्क आणि चॅलेंजर्स पूर्ण करून या शो मध्ये टिकून राहायचं आहे. याच शोमध्ये सूत्रसंचालन करणारा एजाज खान हा शो मधील स्पर्धक तरुणींना अश्लील प्रश्न विचारून कपडे काढायला सांगत आहे. त्याचबरोबर ‘कामसूत्र’वर चर्चा करताना या तरुण-तरुणींना अश्लील हावभाव, कृत्य आणि पोझ करायला सांगत आहे. विशेष म्हणजे कोणताही आक्षेप न घेता सगळे स्पर्धक हे करतही आहेत. अशाच काही अश्लील टास्कच्या क्लिप्स समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या असून या शोवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

HOUSE ARREST SHOW बंदी घालण्याची मागणी; महिला आयोगाने बजावली नोटीस #azazkhan #houseofarrest #topnews
हाऊस अरेस्ट या शोची दखल थेट महिला आयोगाने घेतली आहे. त्याचबरोबर सूत्रसंचालक एजाज खान याला समन्स पाठवण्यात आलंय. विविध राजकीय नेत्यांनी शो बंद करण्याची मागणी केली आहे.राष्ट्रीय महिला आयोगाने उल्लू ॲपवरील या हाऊस अरेस्ट शोची गंभीर दखल घेऊन एजाज खान आणि उल्लू ॲपचा सीईओ विभू आगरवाल या दोघांना आयोगासमोर हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

भारतीय न्याय संहिता 2023 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कायदा 2000 यानुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. या दोघांनी 9 मे रोजी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सुनावणीला सामोरं जावं, असे स्पष्ट आदेश काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या शोचं प्रसारण थांबवण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांना दिले आहेत. अशा प्रकारचा अश्लील कंटेंट असणाऱ्या सर्वच ओटी प्लॅटफॉर्म्सवर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी देखील केली आहे.

त्यामुळे अल्पावधीतच हा शो गुंडाळावा लागण्याची शक्यता आहे.नुकताच इंडियाज हॉट लेटेंड या शो मध्ये अक्षेपार्ह गोष्टी बोलल्यामुळे रणवीर अलाहाबादिया या युट्युब वर सह अनेकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागलं. त्याच धर्तीवर आता हाऊस ऑफ अरेस्ट या शोवर आणि उल्लू अँप वर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. स्वतः महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतल्यामुळे हा शो लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना अशा पद्धतीच्या अश्लील कंटेंटमुळे महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होते. लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे समाजात विकृती पसरवणारे हे शो बंद व्हावेत आणि ओटीटी प्लॅटफॉर्म साठी सुद्धा कडक सेंसरशिप असावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

HOUSE OF ARREST शो बंद करा ; राज्य महिला आयोगाचे पोलिसांना पत्र

Share This News
error: Content is protected !!