PRAKASH AMBEDKAR ON PAHALGAM मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य कारवाईसाठी सज्ज आहे. आता केंद्रसरकारने कच खायला नको, अशी कणखर भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (PRAKASH AMBEDKAR ON PAHALGAM )यांनी मांडली आहे.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी आंबेडकर बोलत होते.
https://www.youtube.com/live/HRzpjd4WbdU?si=ChFxehpPVEzVCA-F
ते म्हणाले की, सैनिकी कारवाईसाठी भारतीय सेना तयार आहे. मात्र, आपले राजकीय नेतृत्वच कुठेतरी कच खात आहे. जर मी नरेंद्र मोदी यांच्या जागी असतो, तर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची युद्धनीती अवलंबली असती. पाकिस्तानविरुद्ध केंद्रसरकारने थेट सैनिकी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यासंदर्भात त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाचा संदर्भ दिला. रशियाने गेल्या २ वर्षात युक्रेनच्या पायाभूत सुविधा उध्वस्त केल्या आहेत. युद्ध थांबल्यावर युक्रेनने नाटोकडे धाव घेतली तरीही त्याचा धोका रशियाला राहणार नाही. मोदी यांच्या जागी मी असतो तर हेच केले असते, असेही त्यांनी म्हटले.
पहलगाम दहशतवादी हल्ला हा आपल्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. आपल्याला अजूनही हल्लेखोर सापडले नाहीत. ते कुठून आले, याची माहिती नाही. हल्ला झाल्यावर दहशतवादी नियंत्रण रेषा पार करून गेले आहेत. त्यामुळे आता थेट सैन्याला आदेश देऊन थेट सैनिकी कारवाई करण्याची गरज असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
Exclusive Report : महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणाऱ्या ‘त्या’ शपथविधीला तीन वर्षे पूर्ण
PAHALGAMच्या पीडित कुटुंबीयांना 50 लाखांची आर्थिक मदत ; STATE CABINETचा निर्णय
Maharashtra Politics : राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या नांदेडला यंदा मंत्रीपदाचा भोपळा