नितीन जगताप यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झालं आहे.
नितीन जगताप हे गोखले नगर परिसरामध्ये तात्या या नावाने ओळखले जात होते.
1992 ते 2002 या कालावधीमध्ये ते महापालिकेचे सदस्य होते. महापालिकेचे प्रशासनावर त्यांचा प्रचंड वचक होता अगदी महापालिकेचे आयुक्तांपासून तर वरिष्ठ वरिष्ठ अधिकारी देखील त्यांना घाबरून असत.
जगताप आपल्या कार्यालयात येणार असे समजल्यावर अनेक अधिकारी पाठीमागच्या दाराने बाहेर पडत असत,इतका त्यांचा दरारा होता. अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. गोखले नगर मधील अनेक गोरगरिबांना त्यांनी सातत्याने मदतीचा हात दिला.
गेले काही वर्ष ते सक्रिय राजकारणातून बाजूला झाले होते.
PUNE NEWS l पुणे ग्रामीण जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू