पहलगाम जखमींची मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस

454 0

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जखमी झाल्याने लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांची विचारपूस केली.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन लष्करी रुग्णालयात प्रत्यक्ष हजर असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमी पर्यटकांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. तुमचे चांगले कर्म आणि ईश्वराची कृपा आहे. त्यामुळे तुम्ही वाचलात. काही काळजी करू नका, सगळे ठीक होईल. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी जखमींना दिला.

Share This News
error: Content is protected !!