(Chandrashekhar Bawankule)

महसूलमंत्र्यांच्या ‘त्या’ आदेशाने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

1705 0

मुंबई : वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कार्यालय सोडल्यास अशा कर्मचारी, अधिकाऱ्यांचे थेट निलंबन अथवा कठोर शिस्तभंग कारवाई केली जाईल, असा आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केल्यामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.

महसूल विभागात स्थावर जमीन, मालमत्ता खरेदी, विक्री व्यवहार, सातबारा, मुद्रांक आणि जनतेशी संबंधित कामे असतात. या कामांसाठी मंत्रालयात लोकांची वर्दळ असते. मात्र,
क्षेत्रीय कार्यालयांतील तहसीलदार ते निवड श्रेणीतील अप्पर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक तसेच जमाबंदी आयुक्त व संचालक (भूमी अभिलेख) यांच्या अधिनस्थ अधिकारी, कर्मचारी मुख्यालयात गैरहजर राहत असल्याची तक्रार महसूलमंत्र्यांकडे आली होती. त्यावर कर्मचारी, अधिकाऱ्यांना कामाच्या शिस्तीचे धडे देण्यासाठी महसूलमंत्री बावनकुळे यांनी वरिष्ठांच्या पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना निलंबित अथवा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Share This News
error: Content is protected !!