झीशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी ; १० कोटींची मागणी

59 0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार झीशान सिद्दिकी यांना १० कोटी रुपयांची खंडणी दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

सिद्दिकी यांना एका अज्ञात मेल आयडीवरून हा धमकीचा संदेश पाठवण्यात आला आहे. याबाबत मुंबई पोलिसांना सूचना दिल्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्याचे एक पथक सिद्दिकी यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले.

झीशान यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी घेतली होती.

याप्रकरणात पोलिसांनी उत्तरप्रदेश, बहराईच येथील हरीश कुमार, धर्मराज कश्यप हरियाणाचा गुरमेल बलजीत सिंग आणि पुण्यातील प्रवीण लोणकर आदींना अटक केली आहे. तीनदा आमदार व मंत्री राहिलेले बाबा सिद्दिकी यांचा खूप प्रभाव होता. त्यांचे पुत्र झीशान सिद्दिकी हे देखील वांद्रे पूर्वेतून काँग्रेसचे आमदार राहिले होते. बॉलीवूड कनेक्शन, इफ्तार पार्ट्या, रिअल इस्टेट व्यवसायाशी सिद्दिकी कुटुंबाचा संबंध आहे. मुंबईतील दोन झोपडपट्ट्यांच्या विकासाचे कंत्राट त्यांच्याकडे होते.

Share This News
error: Content is protected !!