उद्धव आणि राज ठाकरे राजकीय अनफिट- वकील गुणरत्न सदावर्ते

Gunratna sadavrte: उद्धव आणि राज ठाकरे राजकीय अनफिट- वकील गुणरत्न सदावर्ते

336 0

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजकीय वेडेपण लागले असून काय करु, कसे करु, असा प्रश्न त्यांना पडला आहे. या दोघांनाही पॉलिटिकल सायकॉलॉजिस्टची गरज असून ते राजकीय अनफिट आहेत, अशी टीका वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavrte) यांनी केली आहे. मनसेतील संदीप देशपांडे राइट पर्सन ऑन रॉन्ग प्लेस असल्याचे त्यांनी म्हटले.

राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येण्याबद्दल बोलताना सदावर्ते म्हणाले की, सबकुछ फिल्मी हैं, स्वतः प्रोडक्शन काढणे आणि महेश मांजरेकर यांना डायरेक्टर करणे, हे सगळे फुल टू फिल्मी आहे. हा ड्रामा सुद्धा सिरिअस नाही. दोन्ही राजकीय पक्षांचे काय अस्तित्व काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांचे लोक विधानसभा आणि लोकसभेत आहे का? एक दोन इव्हेंट ते घेतात. उद्धव ठाकरे मामूजान, भाईजान करतात, किती त्यांना समजले आणि किती न्याय हक्कासाठी ते उभे राहतात सर्वांना माहिती असल्याचे त्यांनी म्हटले. वक्फमुळे लोकांना त्रास होत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे किरकोळ की होलसेल उघडणार आहेत? त्यांचा ब्रँड कुठला? चिन्ह टिकू शकते का, असे सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केले.

Share This News
error: Content is protected !!