Dombivli Crime news : डोंबिवली : तमिळनाडूतील व्यवसायाने डोंबिवली अंडी विक्री करणाऱ्याला व्यक्तीला तब्बल ३२ लाख ५० हजाराची फसवणूक केली आहे. जानेवारी २०२४ ते मे २०२४ या कालावधीत हा सर्व फसवणुकीचा प्रकार घडला आहे. अंडी विक्री करणाऱ्या व्यक्तीचे नाव कामदेव अविनाश असे आहे. (Dombivli Crime news)
तसेच ते डोंबिवली जिमखाना येथील परिसरात राहतात. तमिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली, प्रकाशनगर भागात राहत असलेल्या व्यंकट राजा यांच्या विरुद्ध व्यावसायिकाने जोशी यांनी आर्थिक फरवणुकीची तक्रार दाखल केला आहे.
देख लेंगे राज ठाकरे में कितना है दम – गुणरत्न सदावर्ते
तमीळनाडूतील तिरूचापल्ली येथील व्यंकट राजा यांना आपण दुबई येथे अंडी विक्री करण्यासाठी ३२ लाख ५० हजार रूपये दिले होते. परंतु, गुन्हा दाखल व्यंकट राजा यांनी अंडी विक्री व्यावसायिक कामदेव जोशी यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, आपणास अंधारात ठेऊन व्यंकट राजा यांनी भारत देशात अन्य व्यावसायिकांना परस्पर अंडी विक्री केली. असे व्यावसायिक कामदेव जोशी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यातील प्राथमिक तपासणी अहवालात म्हटले.
TOP NEWS MARATHI :Sangram thopte यांनी फडणवीसांच्या झाष्यात येऊ नये- Harshvardhan sapkal
हा सर्व प्रकार उघडकीला आल्यानंतर व्यंकट राजा यांनी कामदेव जोशी यांच्या सोबत ठरलेल्या वेळेत आणि व्यवहाराप्रमाणे अंडी परत केली नाही, तसेच त्यांनी अंडी विक्रीसाठी दिलेले ३२ लाख ५० हजार रूपयेही परत केले नाहीत.
हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी, व्यावसायिक जोशी यांनी दिलेले पैसे परत करण्यासाठी गेल्या वर्षभरात व्यंकट राजा यांच्याकडे तगादा लावला होता. तसेच वारंवार त्यांनी वारंवार मागणी करून देखील व्यंकट राजा ३२ लाख ५० हजार रूपये परत करत नसल्याने ते आपली फसवणूक करत आहे अशी त्यांना खात्री झाल्यास व्यावसायिक कामदेव जोशी यांनी गुरुवारी मानपाडा पोलीस ठाण्यात व्यंकट राजा यांच्या विरुध्द आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल केला आहे. या घटनेप्रकरणी पोलीस निरीक्षक जयपालसिंह गिरासे तपास करत आहेत.