CHANDAN NAGAR POLICE: भाजी मंडईत आई आणि मुलाकडून तरुणाच्या डोक्यात फरशीने घाव घालून हत्या

CHANDAN NAGAR POLICE: भाजी मंडईत आई आणि मुलाकडून तरुणाच्या डोक्यात फरशीने घाव घालून हत्या

720 0

पुण्यात चंदन नगर (chandan nagar) परिसरामध्ये अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी गर्दी असतानाच एका महिलेने आणि तिच्या मुलाने तरुणाच्या डोक्यात फरशी घालून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून या अमानुष खुनामागचं कारणही आता समोर आलं आहे.

ही घटना गुरुवारी पुण्यातील चंदन नगर परिसरामध्ये असलेल्या भाजी मंडईत रात्री 11 च्या सुमारास घडली. प्रदीप अडागळे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर ऋषिकेश उर्फ ऋषी काकडे, आई सविता काकडे आणि मित्र शुभम मांढरे अशी आरोपींची नावं आहेत. प्रदीपचे ऋषीच्या बहिणीचे प्रेम संबंध होते. अशातच तो तिला अनेकदा त्रास द्यायचा. त्याने आधी ऋषी आणि त्याच्या आईला शिवीगाळ केल्याची माहिती हे समोर आली आहे. या सगळ्याचा राग ऋषीच्या डोक्यात होता. त्यावरूनच गुरुवारी रात्री भाजी मंडई परिसरातील स्वच्छतागृहासमोर तुटलेल्या फरशीच्या तुकडे डोक्यात मारून आरोपी ऋषी त्याची आई आणि त्याच्या मित्राने प्रदीपला संपवण्याचा प्रयत्न केला. प्रदीप रस्त्यावर कोसळल्यानंतरही बराच वेळ ऋषी त्याच्या डोक्यात फरशीचे गाव घालत होता. या सगळ्या नंतर प्रदीपला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आलं. रात्रभर त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी तीनही आरोपींनी विरोधात चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं कारण काय ? 

मृत प्रदीप आडागळे हा वारंवार आरोपींना शिव्या द्यायचा त्यामुळे त्यांनी प्रदीप ला मारल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ज्या पद्धतीने त्याला मारण्यात आलं, ते दृश्य अतिशय भयानक होतं. भाजी मंडईत प्रचंड गर्दी असताना या गर्दीच्या समोरच या आई आणि मुलाने मिळून प्रदीपला बेदम मारहाण केली. त्याला रक्ताच्या थारोळ्यात सोडून दोघेही तिथून पसार झाले. दरम्यान आज सकाळी प्रदीपचा मृत्यू झाला. त्यानंतर चंदन नगर पोलिसांनी तीनही आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यातही घेतलं आहे. त्यामुळे या हत्येच्या मागे फक्त शिवीगाळ हेच कारण आहे की आणखी कुठलं कारण आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!