पुण्याची प्रसिद्ध बाकरवडी म्हणून तुम्ही जी चितळेंची बाकरवडी खात आहात ती नक्की चितळेंचीच आहे का ? हे तपासून घ्या, कारण पुण्यातील प्रसिद्ध चितळे बाकरवडी (CHITALE BAKARWADI) यांच्या नावाची आणि पॅकेजेंशी मिळतच होतं प्रॉडक्ट तयार करून बाजारात विक्री केलं जात असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चितळे स्वीट होम आमच्या दुसऱ्या मिठाईच्या दुकानाने बाकरवडी पॅकेट लॉन्च केले आहेत. नाव सारखंच असल्यामुळे अनेकांची यात गफलत होत आहे. मात्र दोन्ही पॅकेटचे पॅकेजिंग वेगळे आहेत. मात्र दुसऱ्या बाकरवडी पॅकेटवर प्रसिद्ध चितळे मिठाईवाले यांचाच पत्ता, ईमेल आयडी आणि वेबसाईट ची लिंक टाकण्यात आली आहे. याचा अर्थ प्रसिद्ध चितळे बाकरवडीची कॉपी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्याच अनुषंगाने या बनावट बाकरवडीची विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयीची माहिती पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी दिली आहे.