Marathi vs Non Marathi: मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी माणसाला परप्रांतीयांचा त्रास करावा सहन लागत आहे. असेच काही प्रकरण पुन्हा समोर आले आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये मराठी माणसाला त्रास देणाऱ्या व्यक्तीला मनसे स्टाईलने कार्यकर्त्यांकडून चांगलाच धडा शिकवला आहे. हे प्रकरण नॉनव्हेज खाण्यावरून झाल्याचं सांगितले जात आहे. मराठी कुटुंबाने नॉनव्हेज खाल्याने हिणवलं गेले तसेच अपमानास्पद वागणूक दिले गेल्याचं कळले आहे. ही बाब मनसे कार्यकर्त्यांना कळताच घटनेस्थळी जाऊन तेथील अमराठी रहिवाशांना मनसे स्टाईलनं समज दिल्याचं पाहायला मिळालं आहे. (Marathi vs Non Marathi)
मुंबईतील घाटकोपर येथील एका सोसायटील चार मराठी घरं आहेत. या संपूर्ण इमारतीत गुजरात येथील लोक राहतात. ‘तुम मराठी लोग गंदा है.. मच्छी मटण खाते हो’ असे म्हणत अमराठी नागरिकांकडून त्रास दिला गेल्याचं आरोप होत आहे. तसेच हिन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचाही आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.
याची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी त्या सोसायटीत जाऊन गुजराती, अमराठी रहिवाशांना आपल्याच शैलीत समज देत मराठी लोक गंदे…. तर हा महाराष्ट्र पण मराठी माणसाचाच आहे मग तुम्ही इथं कशाला आलात? असा सवाल करत समज दिल्याचं पाहायला मिळालं. आणि मराठी माणसाला त्रास देणारे चार कुटुंब घर असतील तर त्यांच्यासाठी उभे राहणारे इथे 4000 येतील अशा शब्दांत खडे बोल सुनावले. यावेळी मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी रहिवाशांना विचारले असता, ‘आम्ही अशी भेदभावाची वागणूक दिली नसल्याचं आणि मांसाहार खाण्यावर कोणतेही बंधन आणलं जात नसल्याचं म्हणलं. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांना न जुमानता मराठी माणसासाठी आवाज उठवला.