बेल्जियम: २०१८ मध्ये फरार झालेला मेहुल चोक्सी अखेर पोलिसांच्या ताब्यात. प्रत्यार्पण विनंती आधारित स्थानिक पोलिसांची कारवाई. उपचारासाठी बेल्जियम मध्ये गेला असताना पोलिसांनी केली कारवाई. अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate :ED) याच्या शोधात होती. परंतु मेहुल चोक्सी देशाबाहेर पळून गेल्यामुळे (ED)ला आंतरराष्ट्रीय पोलिसांची मदत घ्यावी लागली. त्याच्या नावाने ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव इंटरपोलने त्याच्यावरील ‘रेड कॉर्नर नोटीस मागे घेतल्यामुळे’ भारताला प्रत्यार्पण मार्गाने प्रयत्न करावे लागले. भारताला अटक वॉरंट सोपवावे लागले चोक्सी विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने २०१८ आणि २०२१ मध्ये दोन अटक वॉरंट्स जारी केली होती. त्याच्यावर सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३,८५० कोटींचा गंडा घालण्याचा आरोप आहे, ही वॉरंट बेल्जियमला प्रत्यार्पणासाठी दिली गेली. त्यानंतर तेथील स्थानिक पोलिसांनी चोक्सीला बेल्जियम मधील एका रुग्णालयात असताना अटक केली. रेड नोटीस हटवल्यानंतर अंमलबजावणीसाठी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण संस्था यांसह भारतीय यंत्रणांनी त्याच्या पुन्हा प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू केले. बेल्जियम सरकारने त्यांच्या देशात चोक्सी असल्याचे मान्य केले आणि या प्रकरणाला खूप महत्त्व आणि लक्ष देत असल्याचे सांगितले चोक्सी गेल्यावर्षी ॲंटिग्वातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर तो वैद्यकीय उपचारासाठी बेल्जियम मध्ये असताना त्याला बेल्जियम पोलिसांकडून अटक करण्यात आले.
वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होतीः निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासलेंचा दावा:
चौकशीने पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३,८५० कोटींचा गंडा घातला आहे. या घोटाळ्यात त्याचा भाच्चा निरव मोदीही सहभागी होता. चोक्सी गेल्यावर्षी वैद्यकीय उपचारासाठी बेल्जियम मध्ये दाखल झाला. त्याने भारत सोडण्यापूर्वी २०१७ मध्ये ॲंटिग्वाआणि बार्बुडा या देशांचे नागरिकत्व घेतले. त्यानंतर तो क्युबाला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली होती. मात्र त्याचे वकील म्हणाले होते की त्याचे ॲंटिग्वामधुन अपहरण करण्यात आले. आणि डोमिनिका मध्ये त्यांनी ते सिद्ध केले. व डोमिनिकाने त्याला भारताकडे प्रत्यार्पित करण्याऐवजी परत ॲंटिग्वाला पाठवले. चोक्सीने भारतामध्ये २०१४ ते २०१७ या काळात पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगणमत करून फसवणूक केली आणि खोट्या पद्धतीने लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट मिळवले. त्यामुळे पीएनबी ला ६ हजार ९७ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला. ईडीने भारतभरात चोक्सीच्या गीतांजली ग्रुपशी संबंधित १३६ हून अधिक ठिकाणी झडती घेतली आणि ५९७.७५ कोटींच्या मौल्यवान वस्तू व दागिने जप्त केले. तसेच देश-विदेशातील मालमत्ता, वाहने, बँक खाती, कारखाना, शेअर्स आणि दागिने मिळन एक हजार ९६८ कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त केली. त्याची एकूण २,५६५.९० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्याच्यावर आतापर्यंत तीन आरोपपत्र दाखल करण्यात आली आहेत. दोन आठवड्यांपूर्वी मेहुल चोक्सी व त्याची पत्नी प्रीती यांनी बेल्जियममध्ये एफ रेसिडेन्सी कार्ड घेतले. प्रीती ही बेल्जियमची नागरिक आहे आणि तिचे व चोक्सीच्या कुटुंबाचे तेथे नातेवाईक आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये त्यांनी अॅटिग्वामधून बेल्जियममध्ये स्थलांतर केले. दरम्यान, नीरव मोदीला २०१९ मध्ये लंडनमधील मेट्रोपॉलिटन पोलिसांनी अटक केली होती आणि त्याचे सर्व कायदेशीर पर्याय संपले असतानाही तो अजूनही कायदेशीर लढाई तेथे लढण्याचा प्रयत्न करत आहे.
पुढचे पाऊल : भारतात प्रत्यार्पण ?
भारत आणि बेल्जियम यांच्यात दीर्घकालीन प्रत्यार्पण करार आहे. त्याद्वारे खून, बलात्कार, फसवणूक, बनावटगिरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार आरोपींना एकमेकांना सुपूर्द करता येते. या करारानुसार दोन्ही देशांच्या कायद्यांनुसार एखादा गुन्हा गुन्हा ठरतो असे सिद्ध झाल्यासच प्रत्यार्पण करता येते.