धक्कादायक! पुण्यात भूतानच्या 27 वर्षीय तरुणीवर 7 जणांचा बलात्कार

माता न तू वैरीणी… मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करत आईनेच बॉयफ्रेंडशी ठेवायला लावले संबंध

577 0

पुण्यात आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. स्वतःच्या अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून अनैतिक संबंध असलेल्या बॉयफ्रेंडला पाठवून त्याला तिच्याबरोबर संबंध ठेवायला भाग पाडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी बिबेवाडी पोलिसांनी विकृत आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

भारती विकास कुऱ्हाडे असं या महिलेचं नाव असून तिचे गुरूदेव कुमार स्वामी नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. हे दोघे पुण्यातील पुण्यातील बिबवेवाडी परिसरात वास्तव्यास आहेत. आरोपी महिलेला एक अल्पवयीन मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी महिलेने आपल्या बॉयफ्रेंडसोबत पोटच्या लेकीचे अश्लील व्हिडिओ शूट केले. त्या नंतर ते आपल्याच नातेवाईकांना पाठवून पुढे व्हायरलही केले. स्वतःच्याच मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून तिने तिच्या बॉयफ्रेंडला पाठवले. त्याला मुली बरोबर अनैतिक संबंध ठेवायला सांगितले. या सगळ्यामुळे अल्पवयीन मुलीला शारीरिक आणि मानसिक धक्का बसला. त्यामुळे आई आणि तिच्या बॉयफ्रेंड करून होत असलेला हा छळ सहन न झाल्यामुळे तिने घरमालकाला आई आणि आईच्या बॉयफ्रेंडने केलेल्या कृत्याची माहिती दिली. आपलं पितळ उघडं पडल्याचं समजताच आरोपी महिला तिच्या प्रियकरा सह फरार झाली. मात्र बिबेवाडी पोलिसांनी लागलीच या प्रकरणाचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला.

गुन्हा दाखल करून बिबेवाडी पोलिसांनी तात्काळ फरार आरोपी आई आणि तिच्या प्रियकराचा शोध घेण्यास सुरूवात केली. अखेर पोलिसांच्या प्रयत्नामुळे या दोघांनाही अटक करण्यात पोलिसांना यश आलं. अटकेनंतर या दोघांशीही पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीत दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र एखादी आई आपल्या मुलीबरोबर इतकं अमानवीय कृत्य कशी काय करू शकते हाच प्रश्न सध्या जनसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!