‘ही मॅन’ धर्मेंद्र यांनी आपल्या चुकीमधून काय दिला संदेश ? पाहा (व्हिडिओ)

545 0

मुंबई- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. मग तो व्यायाम असला तरीही. आपल्या आवाक्यापेक्षा अति व्यायाम करणे बऱ्याचदा हानिकारक ठरते. असाच अनुभव बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना आला आहे. ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर करून त्यांनी नेमका काय संदेश दिला हे पाहू.

धर्मेंद्र या वयात देखील नियमित व्यायाम करतात. म्हणूनच आजही ते ऍक्टिव्ह आहेत. पण अलीकडेच व्यायामाचा अतिरेक झाल्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल व्हावे लागले. व्यायाम करत असताना त्यांना पाठदुखीचा त्रास झाला, त्यानंतर त्यांना चार दिवस इस्पितळात दाखल करावे लागले. नुकताच त्यांना रविवारी इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला.

इस्पितळातून घरी आल्यानंतर धर्मेंद्र यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून आपल्या चाहत्यांना एक संदेश दिला. त्यामध्ये धर्मेंद्र म्हणतात. ‘मित्रांनो, कशाचाही अतिरेक करू नका. मी केले आणि मला त्रास झाला. पाठीचा एक मोठा स्नायू ओढला गेला. त्यामुळे मला इस्पितळात जावं लागलं. गेल्या चार दिवसांपासून खूप त्रास झाला. तरी तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने मी परत आलो आहे. त्यामुळे, काळजी करू नका. आता मी खूप काळजी घेईन.’

बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र या नावाला वेगळे वलय आहे. धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये अर्जुन हिंगोरानीच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या सिनेमाद्वारे पदार्पण केले. त्यानंतर हाणामारीच्या सिनेमा बरोबरच हलक्या फुलक्या कॉमेडी सिनेमामध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. ‘अनुपमा’, ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘यादों की बारात’, ‘यकीन’, ‘सत्यकम’ आणि ‘सीता और गीता’, ‘लोफर’, ‘झील के उस पार’, ‘प्रतिज्ञा’ अशी त्यांच्या सिनेमाची प्रामुख्याने नावे घ्यावी लागतील.
लवकरच धर्मेंद्र हे करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये दिसणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत जया बच्चन, शबाना आझमी, आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्यासोबत दिसणार आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide