सुपरफास्ट

व्हॉट्सॲप दक्ष प्रणालीमुळे अवैध धंद्याना बसणार आळा

पुणे : आता घरबसल्या अवैध धंद्याना आळा घालणं शक्य होणार आहे. तसेच तक्रार दाराचे नाव देखील गोपनीय ठेवण्यात येणार आहे. जिल्यातील अवैध धंद्याच्या बंदोबस्तासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी व्हॉट्सॲप दक्ष प्रणाली, हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.

जुगार अड्डे, मटका, अवैध दारू विक्री आणि ड्रॅगचा व्यापार, यांसारख्या बेकायदेशीर धंद्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आले. बऱ्याच वेळा तक्रार करण्यासाठी नागरिकांना पोलिस स्टेशनमध्ये जाणे शक्य होत नाही तसेच भिती वाटते. यासाठी पुणे पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला आहे. व्हॉट्सॲप दक्ष प्रणाली चा वापर करून नागरिकांना घरबसल्या, मोबाईलच्या माध्यमातून तक्रार नोंदवता येईल. तसेच वेळेची बचत देखील होणार आहे.

तक्रार करताना आपल्या भागातील अवैध व्यवसायाचे ठिकाण, संबंधित व्यक्तीचे नाव, फोटो, आणि लोकेशनसारखी माहिती देता येणार आहे. तसेच तक्रार सोबत पोलिस स्टेशन आणि उपविभागाचे नाव नोंदविणे आवश्यक आहे. या प्रणालीद्वारे तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे ओळख, नाव, मोबाईल क्रमांक पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

जिल्यातील अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी तक्रार कराव्यात, त्यावर कारवाई केली जाईल असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या उपस्थितीत या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.