आरोपीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं

पुण्यातील सराफ व्यावसायिक अडकला हनीट्रॅपमध्ये; महिलेने उकळले तब्बल “इतके” लाख रुपये

214 0

पुण्यातील सराफ व्यापाऱ्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून तब्बल 27 लाख 56 हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे व्यापाराच्या पत्नीने बदनामीच्या भीतीने पुण्यातील घर विकून हे पैसे दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय ‌?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केडगावच्या 32 वर्षीय महिलेनं पुण्यातील सराफ व्यापाऱ्याला तेरा वर्षांपासून हनीट्रॅपमध्ये अडकवलं होतं. महिलेची बहीण पुण्यात राहत असल्याने तिच्या माध्यमातून सराफ व्यापाऱ्याशी ओळख झाली होती. आपल्याला दागिने तयार करून घ्यायचे असल्याचं सांगून महिलेनं व्यापाऱ्याशी ओळख वाढवली होती. ही महिला वारंवार व्यापाऱ्याला फोन करायची. 2013 मध्ये हा व्यापारी पुण्याहून नगरमार्गे गावी जाताना महिलेचा फोन आला. माझं घर वाटेतच आहे असं म्हणत या महिलेने व्यापाऱ्याला घरी येण्यासाठी आग्रह केला. व्यापारी घरी गेल्यानंतर त्याच्याशी जवळीक वाढवली.

त्यानंतर महिलेनं व्यापाऱ्याला एक दिवस तिच्या बहिणीच्या घरीही बोलावून तिच्याच घरी थांबायला भाग पाडलं. दरम्यान तिने काही व्हिडिओ काढून व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी पैशांची मागणी केली. दरम्यान, बरेच पैसे दिल्यानंतर शेवटी व्यापाऱ्यानं सगळा प्रकार पत्नीला सांगितला. तेव्हा पत्नीनेही बदनामीच्या भितीने पुण्यातलं घर विकून महिलेला पैसे देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार व्यापाऱ्याने घर विकून महिलेला 18 लाख रुपये दिले. त्या पैशातून महिलेने स्वतः 43 लाखांचं घर खरेदी केलं. 23 लाख रुपयांचे हप्तेही व्यापाऱ्याला भरायला सांगितले. त्यामुळे आत्तापर्यंत या महिलेने व्यापाऱ्याकडून तब्बल 27 लाख 56 हजार रुपये उकळले. तरीही महिला पैशांची मागणी करत असल्याने व सर्व पैसे संपल्याने व्यापारी पती-पत्नीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पोलिसांकडून या महिलेचा शोध सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!