टेरीफमुळे जागतिक शेअर मार्केट गडबडल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी लागू केलेल्या टेरीफ या नवीन करा मुळे जागतिक स्तरावर शेअर मार्केटमध्ये पडझड
झाली आहे. प्रत्येक देशातील गुंतवणुकीवर टेरीफ कराचा परिणाम झालं आहे(Trump tariffs affecting most nations). डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला बरसा पाठींबा मिळत नसून या निर्णयाचा परिणाम सर्व जगभरातील गुंतवणूकदारांवर शेअर मार्केट वर होत आहे. जगभरातील शेअर मार्केट मधील शेअर्स ची किंमत सध्या कमी होत चालली आहे.
भारतातील खालील तीन ट्रेडिंग दिवसांतील निफ्टी ५० आणि निफ्टी बँक निर्देशांकांची माहिती
•निफ्टी ५० निर्देशांक कामगिरी:
४ एप्रिल २०२५: निफ्टी ५० निर्देशांक २२,९०४.४५ वर बंद झाला, जो मागील दिवसाच्या तुलनेत १.४९% नी घसरला.
७ एप्रिल २०२५: निर्देशांकात मोठी घसरण झाली आणि तो ३.२४% नी खाली येऊन २२,१६१.६० वर बंद झाला. अमेरिकेच्या टॅरिफ घोषणेमुळे बाजारात अस्थिरता वाढली होती.
८ एप्रिल २०२५: बाजारात पुनरुज्जीवन झाले. निफ्टी ५० निर्देशांक १.०८% नी वाढून २२,४०९.१५ वर पोहोचला. हे खरेदीदारांच्या सक्रीयतेमुळे आणि आशियाई बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे झाले.
•निफ्टी बँक निर्देशांक कामगिरी:
निफ्टी बँक निर्देशांकाने देखील या कालावधीत बाजाराच्या सर्वसाधारण प्रवाहाचे अनुकरण केले.
८ एप्रिल २०२५: या दिवशी निफ्टी बँक निर्देशांकात सकारात्मक हालचाल दिसून आली आणि निर्देशांक वाढताना दिसला.ही घडामोडी जागतिक व्यापार तणावांवरील गुंतवणूकदारांच्या भावना आणि बाजारातील अस्थिरतेचे प्रतिबिंब आहेत.
अमेरिकेने टेरीफ लावल्या नंतर चीन खेळणार ‘ही’ नवी खेळी?
•जागतिक शेअर मार्केट वर टेरीफ चा परिणाम ?
भारत -४.२५%
चीन – १२%
तैवान -११%
हाँग काँग – ८.७%
जपान – ८.०%
सिंगापूर -७.१%
ऑस्ट्रेलिया – ६.३%
अमेरिका -६.१%
दक्षिण कोरिया -५.५%
शेअर मार्केट मधील घसरणी मुळे कच्चा तेलाच्या किमतीत जागतिक बाजारात खूपच खालच्या स्तरावर पोचले आहेत .जागतिक तेल निर्देशांक २.३० %नी घसरून ६४.११ डॉलर प्रतिबेलर इतका झाला आहे. २९% नी घसरले बिटकॉइनची तर भाव आले ७७ हजार डॉलरवर. चांदी चे भाव १२,००० नी घसरले सोन्याचे भाव २८,००० रुपयांनी गडगडले. एकट्या भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे तब्बल १४.९ लाख कोटी रुपये बुडाले.(Trump tariffs affecting most nations)
मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय शेअर मार्केटमध्ये पडझड झाली आहे(Trump tariffs affecting most nations). शेअर मार्केट मधील बँक निफ्टी चा ग्राफ उतरत्या क्रमानेच जात आहे. यादरम्यान या आर्थिक युद्धाचा परिणाम मंदीच्या स्वरूपात होऊ शकतो, याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे वस्तू माहागतील काही योजनांमधील पैसे कमी करावे लागतील ग्रामविकास, नगर विकास अशा आर्थिक किंवा औद्योगिक विकासाच्या योजना थोड्या कालावधी करिता थांबवाव्या लागतील कारण या मंदीमुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे.