गुन्हा रद्द होण्यासाठी कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव

गुन्हा रद्द होण्यासाठी कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव

495 0

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत तयार करणारा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्यावरील गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मुंबई पोलिसांनी आपल्याविरुद्ध खार पोलीस ठाण्यात दाखल केलेला एफआयआर रद्द करावा, अशी मागणी कामराने याचिकेतून केली आहे.

हा एफआयआर म्हणजे, आपल्याला संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे त्याने म्हटले आहे. कामराच्या याचिकेवर २१ एप्रिल रोजी न्यायमूर्ती एस.व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती एस.एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म बुक माय शोने शनिवारी त्यांच्या वेबसाइटवरील कलाकारांच्या यादीतून कुणाल कामराचे नाव काढून टाकले आहे. कामराशी संबंधित सर्व सामग्रीही हटविण्यात आली आहे. कामराने त्याच्या शोमध्ये एकनाथ शिंदे यांना देशद्रोही म्हटले होते. शिवसेना नेते राहुल कनाल यांनी 3 एप्रिल रोजी बुक मायशोला पत्र लिहून कामराच्या शोची तिकिटे विकू नयेत,अशी मागणी केली होती.

कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी २ एप्रिल रोजी तिसऱ्यांदा समन्स बजावूनही तो पोलिसांसमोर हजर झाला नाही. पोलिसांनी त्याला ५ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले होते.

Share This News
error: Content is protected !!