अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात भूकंप झाला आहे. सोमवारी भारतीय भांडवली बाजारात अभूतपूर्व अशी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी प्री-ओपनिंगमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेनेक्स 3600 अंकांनी कोसळला तर निफ्टी 1400 अंकांनी खाली आला.
प्री ओपनिंग सेशन आणि प्रत्यक्ष बाजार उघडल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. भांडवली बाजाराचे व्यवहार सुरु होताच सेन्सेक्स 2,743 अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टीही जवळपास 900 अंकांनी खाली घसरला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या पैशांची राखरांगोळी झाली आहे. सेन्सेक्स तब्बल 3 हजार अंकांनी कोसळल्याने गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटींचं नुकसान झाले आहे.