BHOR RAM NAVAMI: 300 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या भोरच्या राजवाड्यात श्रीरामजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

BHOR RAM NAVAMI: 300 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या भोरच्या राजवाड्यात श्रीरामजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

658 0

देशभर श्रीराम नवमी चा (ram navami) उत्साह पाहायला मिळत असून भोर मधील (bhor) ऐतिहासिक पंतसचिव राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीत रामजन्म सोहळा उत्साहात पार पडला.

सकाळी 11 च्या सुमारास श्रीरामाच्या ताकाची सोनाराच्या दुकानातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी बारा वाजता भोर संस्थानचे राजेशराजे आणि सदस्य यांच्या हस्ते जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी रंगीबेरंगी पडद्यांनी व फुलांनी राजवाडा सजवण्यात आला होता. लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण रामजन्म उत्सवात अगदी उत्साहाने सहभागी झाले होते. रामनामाच्या जयघोषात भोरचा राजवाडा परिसर अगदी दुमदुमून गेला होता चैत्रशुद्ध अष्टमीला सकाळी अधिपतींच्या हस्ते श्रीराम नवमीच्या उत्सवातील धार्मिक पण लवकि कार्यक्रमास सुरुवात होते या श्रीराम जन्मोत्सवाला सुमारे 300 वर्षांहून अधिकची गौरवशाली परंपरा लाभली आहे.

Share This News
error: Content is protected !!