तिसऱ्यांदा समन्स पाठवूनही कुमार कामरा मुंबई पोलिसांसमोर गैरहजर

254 0

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गाणे तयार करणारा विनोदी कलाकार कुणाल कामराला तीनदा समन्स पाठवून देखील शनिवारी तो मुंबई पोलिसांसमोर हजर झाला नाही.

शिवसेनेचे राहुल कनाल यांनी पत्र लिहिल्यानंतर
बुकमायशोने कामराशी संबंधित सर्व गाणी काढून वेबसाइटवरून त्याचे नावही हटवले आहे.

कुणाल कामराने 1 एप्रिल रोजी चेन्नई उच्च न्यायालयात हजर होऊन अटकपूर्व जामीन मिळवला आहे. याबाबत त्याने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ” आज कलाकारांकडे फक्त दोनच पर्याय आहेतः तुमचा आत्मा विकून डॉलरसाठी कठपुतळी बना, किंवा शांतपणे मरून जा, असे त्याने म्हटले आहे.

तथापि, यापूर्वी 28 मार्च रोजी उच्च न्यायालयाने कामरा याला 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. कुणाल कामराने एका स्टैंड-अप कॉमेडी शोमध्ये विडंबन करून शिंदे यांना देशद्रोही म्हटले होते. त्याच्याविरुद्ध मुंबईतील खार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी त्याला तीनदा समन्स पाठवले आहेत. याआधी 31 मार्च रोजी मुंबई पोलिस शिवाजी पार्कमधील कामराच्या घरी पोहोचले होते. शोमध्ये साक्षीदार म्हणून गेलेल्या एका बँकरलाही पोलिसांनी समन्स बजावले आहे.

Share This News
error: Content is protected !!