कुणाल कामराचे शो प्रमोट करू नका, शिवसेनेचे ‘बुकमायशो’ला पत्र

427 0

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचे शो प्रदर्शित किंवा प्रमोट करू नका, अशी मागणी शिवसेनेचे सोशल मीडिया राज्यप्रमुख आणि युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांनी “बूक माय शो”‘ ला पत्र लिहून केली आहे. त्यामुळे कुणाल कामराच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कुणाल कामरा महाराष्ट्रात आल्यानंतर त्याचे शिवसेना स्टाईलने स्वागत करण्याचा इशारा राहुल कनाल यांनी यापूर्वीच दिला आहे.
आता त्यांनी बुकमायशोची पॅरेंट कंपनी बिग ट्री एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष हेमराजनी यांना पत्र लिहून गुन्हेगारी वर्तनाचा इतिहास असणाऱ्या कुणाल कामराच्या कार्यक्रमाची तिकीट विक्री करू नका, अशी विनंती केली आहे. कुणाल कामरा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सार्वजनिक व्यक्तींना लक्ष्य करून त्यांची बदनामी करीत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!