खेळ

Who is Maharashtra kesari Vetal shelke| वेताळ शेळके 66 वा महाराष्ट्र केसरी

 

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजय मिळवत सोलापूरचा वेताळ शेळके 66 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके नेमका आहे तरी कोण? पाहुयात..

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून कर्जत-जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा 26 ते 30 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आलं होतं. या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईचा पहिलवान पृथ्वीराज पाटील आणि सोलापूरचा पहिलवान वेताळ शेळके यांच्यात लढत झाली.

या लढतीत विजय मिळवत वेताळ शेळके हा 66 वा महाराष्ट्र ठरलावेताळ उर्फ दादा शेळके हा बेंबळे येथील एका साध्या शेतकरी कुटुंबातील मुलगा असून त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्याच गावात झाले आहे.

आतापर्यंत अनेक कुस्ती सामन्या पदक मिळवणाऱ्या वेताळ शेळके यांचा अनेक वर्षांपासूनच महाराष्ट्र केसरी पटकावण्याचा स्वप्न होतं अखेर हे स्वप्न पूर्ण झालं असून फटाक्यांची आतषबाजी, शुभेच्छांचा वर्षाव आणि ढोल-ताशांच्या गजरात दादा शेळके याचा सन्मान करण्यात आला

Maharashtra Kesari 2023 : 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा; ‘या’ ठिकाणी रंगणार कुस्त्यांचे सामने