BOMB BLAST BEED: बीड जिल्ह्यातील अर्धमसला गावातील मशिदीमध्ये स्फोट; दोन जण ताब्यात

BOMB BLAST BEED: बीड जिल्ह्यातील अर्धमसला गावातील मशिदीमध्ये स्फोट; दोन जण ताब्यात

846 0

मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण असलेल्या रमजान ईदच्या काही तास आधी बीड (Beed)जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदीमध्ये स्फोट (bomb blast in masjid) झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे मशिदींच्या भिंतींना तडे गेले.

गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा हा विविध कारणांनी चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले. या प्रकरणनंतर बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. आता त्याचंच मुस्लिमांचा पवित्र सण असणाऱ्या रमजान ईद च्या काही तास आधी रात्री अडीचच्या सुमारास बीड मधील गेवराई तालुक्यातील अर्थमसला मशिदीमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे मशिदीमधील फरशीला आणि भिंतींना तडे गेले.या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपासाला सुरुवात केली असून घटनास्थळी पोलीस दलाचे बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे. अर्धामसला गावातील मशिदीत झालेल्या स्फोटाच्या घटनेचे गांभीर्य ओळखत विशेष पोलिस महानिरीक्षक संभाजी नगर परिक्षेत्र वीरेंद्र मिश्र यांनी घटनास्थळी भेट दिली. तर पोलीस अधीक्षक नवनीत कावत सकाळपासून घटनास्थळी ठाण मांडून आहेत. या कर्नाटक पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून, पोलिसांच्या वतीने बीड मधील जनतेला शांततेचे आवाहन करण्यात आले.

 

Share This News
error: Content is protected !!