MANOJ JARANGE PATIL: तोंडातून शब्दही फुटेना; मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

653 0

आज बीड शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी मनोज जरंगे पाटील यांच्या उपस्थितीत ‌मराठा मेळावा आणि बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बीडमधील शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, केमिस्ट, वकील, इंजिनिअर आणि कर्मचारी संघटनाचा हा मेळावा होता. या मेळाव्याला मनोज जरांगे यांच्यासह धनंजय देशमुख उपस्थितीत होते. मनोज जरांगे पाटील यांचं भाषण ऐकण्यासाठी सर्वच जण उत्सुक असताना जरांगे ( Manoj jarange Patil ) भाषणासाठी उभे राहिले. भाषणाला सुरुवात केल्यानंतर अचानक जरांगे यांची प्रकृती खालावली. त्यांना अचानक अस्वस्थ वाटायला लागलं. त्यामुळे त्यांनी भाषण थांबवत ते मला शब्दही फुटत नाहीयेत, असं म्हणत थोडा वेळ आराम केला‌. त्यानंतर पुन्हा भाषणाला सुरुवात केली.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सांगताना मनोज जरांगे पाटील, धनंजय देशमुख यांच्यासह सर्वच उपस्थित नागरिक गहिवरले होते. दरम्यान या भाषणा वेळी मनोज जरंगे पाटील अस्वस्थ वाटत होते. तरीही त्यांनी भाषण करत देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी होई पर्यंत आपण शांत बसायचं नाही. मराठा समाजाने एकजूट कायम ठेवून लढत राहण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी यावेळी केलं.

जरांगेंवर उपचार सुरू

अस्वस्थ वाटत असतानाही जरांगे यांनी भाषण केलं. मात्र भाषण संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे तातडीने कार्यक्रमस्थळी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. त्यातून जरांगे पाटील यांना जवळच असलेल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!