ब्रम्हाकॉर्प लिमिटेडतर्फे वडगावशेरीतील PMC शाळांसाठी सीएसआरच्या माध्यमातून पायाभूत सुविधा विकास आणि तंत्रज्ञान प्रदान 

499 0

पुणे, २७ मार्च २०२५:  पुण्यातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकसकांपैकी एक असलेल्या ब्रम्हाकॉर्प लिमिटेड (BramhaCorp Ltd)  ने आपल्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत वडगावशेरी, पुणे येथील महापालिकेच्या शाळांसाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा विकास आणि तंत्रज्ञान समर्थनाचा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज ब्रम्हाकॉर्प लिमिटेड तर्फे ( BramhaCorp Ltd.) येथील शाळांना पहिल्या टप्प्यात संगणक आणि इंटरॅक्टिव स्क्रीन यांसारखी अत्याधुनिक तंत्रज्ञान साधने प्रदान करण्यात आली.  यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक डिजिटल शिक्षणाच्या आधुनिक साधनांचा लाभ घेऊ शकतील. याशिवाय शिक्षणाला नाविन्य प्रदान करण्याच्या कंपनीच्या दृष्टीकोनाशी हा उपक्रम सुसंगत आहे.
ब्रम्हाकॉर्प लिमिटेड  महापालिकेच्या शाळांची पायाभूत संरचना आणि सुविधा सुधारण्यासही मदत करीत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायक शिकण्याचे वातावरण निर्माण करता येईल. सीएसआरच्या माध्यमातून ( सामाजिक उत्तरदायित्व) विकास कार्यक्रमातर्गत पुढील सुधारणा करण्यात येणार आहेत. याअंतर्गत वर्गखोल्यांसाठी नवीन बाक उपलब्ध करणे,  चांगल्या उजेडासाठी ट्यूब लाईट बसवणे,  विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे लावणे, स्लायडिंग खिडक्या बसवणे, विद्यार्थ्यांसाठी मुलींचे आणि मुलांचे शौचालय दुरुस्त करणे,  पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्लंबिंगचे काम करणे, , हवा खेळती राहावी यासाठी एक्झॉस्ट फॅन्स बसवणे, हात धुण्यासाठी बेसिन बसवणे आणि स्वच्छतेच्या  सवयी लावणे, , पाण्याच्या टाक्यांमधील गळती दुरुस्त करून पाणीपुरवठा कायम राखणे  आदी कामे करण्यात येणार आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना, ब्रम्हाकॉर्प लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक, श्री. अजय अग्रवाल म्हणाले,
“शिक्षण ही उज्ज्वल भविष्यासाठीची पायरी आहे आणि ब्रम्हाकॉर्प लिमिटेड (BramhaCorp Ltd.) मध्ये आम्ही विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यांचा विकास साधण्यासाठी उत्तम सुविधा निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमच्या CSR उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानातील तफावत भरून काढण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि भविष्यातही हा उपक्रम अधिक विस्तारत राहील.”
या उपक्रमाद्वारे ब्रम्हाकॉर्प लिमिटेड ने BramhaCorp Ltd. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि शिक्षण व सामाजिक विकासास चालना देण्यासाठी कटिबद्ध आहे. अशा प्रयत्नांद्वारे कंपनी समाजाच्या हितासाठी योगदान देत राहील आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून त्यांना यशस्वी भविष्यासाठी सक्षम करेल.
ब्रम्हाकॉर्प लिमिटेड  (BramhaCorp) बद्दल:
१९८२ मध्ये स्थापन झालेली BramhaCorp Ltd. ही आलिशान रिअल इस्टेट क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे, जी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि उच्च-गुणवत्तेच्या प्रकल्पांसाठी प्रसिद्ध आहे. पुणे, महाराष्ट्र येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीने Sheraton Grand Pune, F-Residences, Le Meridien Spa & Resort Mahabaleshwar यांसारखे अनेक प्रतिष्ठित प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. नाविन्य, पारदर्शकता आणि उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेसह BramhaCorp ने उद्योग क्षेत्रात नवे मानदंड स्थापित केले आहेत. भविष्यात जागतिक स्तरावर विस्तार करण्याच्या उद्दिष्टासह, ही कंपनी भारतातील रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासास चालना देत आहे.

अधिक माहितीसाठी,BramhaCorp च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या  [www.bramhacorp.in

Share This News
error: Content is protected !!