राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडलं, अधिवेशन संपताच विधिमंडळाच्या विविध समित्यांची (COMMITIES) घोषणा करण्यात आली असून या समितीमध्ये काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावरही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. अधिवेशन संपताच बुधवारी रात्री उशिरा विविध विधिमंडळ समित्यांची घोषणा झाली असून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे लोकलेखा समितीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनील शेळके यांच्याकडे रोजगार हमी योजनेच्या समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोणत्या आमदाराकडे कोणत्या समितीची जबाबदारी देण्यात आली पाहुयात.
सार्वजनिक उपक्रम समिती
राहुल कूल
पंचायत राज समिती
संतोष दानवे
रोजगार हमी योजना समिती
सुनील शेळके
अंदाज समिती
अर्जुन खोतकर
लोकलेखा समिती
विजय वडेट्टीवार
उपविधान समिती
प्रतापराव पाटील चिखलीकर
अनुसूचित जाती कल्याण समिती
नारायण कुचे
अनुसूचित जमाती कल्याण समिती
दौलत दरोडा
विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती
सुहास कांदे
महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती
मोनिका राजळे
इतर मागासवर्ग कल्याण समिती
किसन कथोरे
अल्पसंख्यांक कल्याण समिती
मुरजी पटेल
मराठी भाषा समिती
आशुतोष काळे
विधानसभेच्या समित्या विशेषधिकार समिती
नरेंद्र भोंडेकर
विनंती अर्ज समिती
अण्णा बनसोडे
आश्वासन समिती
रवी राणा
नियम समिती
राहुल नार्वेकर
सदस्य अनुपस्थिती समिती
किरण लहामटे
अशासकीय विधेयके व ठराव समिती
चंद्रदीप नरके
सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबत संयुक्त समिती
अजित पवार
विधान मंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत संयुक्त समिती
अजित पवार
ग्रंथालय समिती
राम शिंदे
आमदार निवास व्यवस्था समिती
शिवेंद्रसिंहराजे भोसले
आहार व्यवस्था समिती
डॉक्टर बालाजी किनीकर
धर्मादाय खाजगी रुग्णालयाची तपासणी करणे समिती
डॉक्टर आशिष जयस्वाल
वातावरणीय बदल संदर्भातील संयुक्त समिती
राम शिंदे