पुण्यातील दौंडमध्ये कचऱ्यात सापडले प्लास्टिकच्या बरण्यात भरलेले अर्भक
पुण्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून कचऱ्यात सहा ते सात अभ्रक फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दौंड शहरातील बोरावकेनगर भागात प्लास्टिकच्या बरण्यात भरून अभ्रक फेकून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून या प्रकारामुळे एकाच खळबळ उडाली आहे. बोरावके नगर परिसरातील H.P. पेट्रोल पंपाशेजारी हे अभ्रक सापडले असून सबंधित घटनेची माहिती डायल 112 ला देण्यात आली त्यानंतर दौंड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
