HINJEWADI BUS CASE UPDATE: हिंजवडी बस आग प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांनी फेटाळले सर्व आरोप

HINJEWADI BUS CASE UPDATE: हिंजवडी बस आग प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांनी फेटाळले सर्व आरोप

866 0

9 मार्च रोजी पुण्यातील हिंजवडी बस (Hinjewadi bus fire case) ला आग लागून चार इंजिनियर्स चा निष्पाप बळी गेला होता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून ड्रायव्हरनच कट रचून ही बस पेटवल्याचं पोलीस तपासातून निष्पन्न झाला मात्र आरोपी जनार्दन हंबर्डिकर (janardan hambardikar) याच्या नातेवाईकांनी मात्र हे संपूर्ण आरोप फेटाळून लावलेत.

कंपनी मालकाशी असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून बुधवार 19 मार्च रोजी जगन्नाथ बस चालक जनार्दन हंबर्डीकर यांना बेंझिन नावाच्या केमिकलचा वापर करून बस पेटवून दिल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. दरम्यान हे सगळे आरोप बसचालक जगन्नाथ हंबर्डीकर यांच्या नातेवाईकांनी फेटाळून लावले असून या प्रकरणात आरोपी जनार्दन याला नाहक गोल जात असल्याचा आरोप त्यांच्या भावानं केला आहे. आरोपी जनार्दन हंबर्डीकर हा पूर्ण शुद्धीत नसताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवलाच कसा असावा सवाल उपस्थित करत ज्या बसला आग लाग त्याच बसमध्ये जनार्दन हंबर्डीकरचे सख्खे भाऊजी देखील होते त्यामुळे ते आग लावतीलच कशी असे अनेक प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान आरोपी जनार्दन हंबर्डीकरच्या नातेवाईकांनी सगळे आरोप फेटाळून लावल्यानंतर आता पोलीस कशा पद्धतीने तपास करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!