HINJEWADI FIRE UPDATE: ‘ती’ आग लागली नाही लावली; हिंजवडी आग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

847 0

हिंजवडी फेस वन मध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर सहा जण जखमी झाले होते. सुरुवातीला तांत्रिक कारणामुळे टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागल्याचा अंदाज होता.

 

मात्र या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून कामगारांची असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिल्याची घटना बुधवारी सकाळी हिंजवडी येथे घडली यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. चालकाने कट रचून हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासामध्ये उघडकीस आले आहे. आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही त्याने गाडीत ठेवल्या. हिंजवडी जवळ आल्यावर त्याने काडीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या आणि केमिकल मुळे बस मध्ये आगीचा भडका उडाल्याचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आरोपीने ही गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!