नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महाल परिसरामध्ये दोन गट आमने सामने आले आहेत. सकाळी औरंगजेबाच्या कबरीविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आलं होतं, यानंतर संध्याकाळी दोन गट आमने-सामने आले आहेत.
पोलिसांवर जमावाकडून दगडफेक केली जात असल्याने पोलिसांच्या बाजूने देखील जमाव पांगविण्यासाठी अश्रूधूर सोडण्यात येत असल्याची माहिती आहे
या हल्ल्यानंतर पोलिसांनी महल परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. पोलीस दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहे.
गल्लोगल्ली, घराघरात जाऊन समाजकंटकांची धरपकड करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी जाळपोळ झाली त्या परिसरात जाऊन पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. तसेच इमारतीत घुसूनही पोलिसांनी समाजकंटकांना अटक केली आहे.