विधान परिषदेच्या (MLC) पाच जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान होत असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
आज अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेचे आमश्या पाडवी हे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निर्वाचित झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली आहे.